AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दररोज दोन अंजीर खाल्ल्याने शरीरावर कोणते परिणाम होतात? जाणून घ्या तज्ञाकडून

अंजीर पोषक तत्वांनी समृद्ध असून शरीराला असंख्य फायदे देतात. पण चला, एका तज्ञाकडून जाणून घेऊया की दररोज दोन अंजीर खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो.

दररोज दोन अंजीर खाल्ल्याने शरीरावर कोणते परिणाम होतात? जाणून घ्या तज्ञाकडून
anjeerImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 28, 2026 | 3:06 PM
Share

आजच्या स्पर्धच्या जीवनात लोकं त्यांच्या आहाराकडे लक्ष देण्याचा पर्यंत करतात. परंतु नेहमी छोट्या-छोट्या पदार्थांचा आरोग्यावर किती महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो हे समजण्यास बहुतेकजण अनेकदा कमी पडतात. अशातच ड्रायफ्रूट्स मधील असलेले अंजीर, एक सुके फळ असून आयुर्वेद आणि आधुनिक पोषणशास्त्र या दोन्हीमध्ये अत्यंत फायदेशीर मानले जाणारे एक सुपरफूड आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपल्या रोजच्या आहारात फक्त दोन अंजीर समावेश केल्याने शरीर मजबूत होण्यास, पचनक्रिया सुधारण्यास आणि अनेक लहान-मोठ्या समस्यांपासून संरक्षण होण्यास मदत होऊ शकते.

परंतु रोजच्या धावपळीत बरेच लोकं अंजीरचे सेवन करणे टाळतात. पण तुम्ही दररोज दोन अंजीर खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात, हे आपण तज्ञांकडून जाणून घेऊया. इतकेच नाही, तर कोणी आणि कोणत्या प्रमाणात त्यांचे सेवन करावे हे देखील जाणून घेऊयात.

पोषक तत्वांनी समृद्ध अंजीर

तज्ञांच्या मते अंजीरमध्ये फायबर, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे केवळ पोट स्वच्छ ठेवण्यासच नव्हे तर रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासही मदत करतात. त्यांचे दररोज सेवन केल्याने अनेक आरोग्य समस्यांपासून आराम मिळू शकतो. चला रोज दोन अंजीर खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.

फोर्टिस हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट (पचनसंस्थेचे तज्ञ) तज्ञांनी नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी अंजीर खाण्याचे प्रचंड फायदे अधोरेखित केले आहेत. डॉ. सांगतात की लोकं अनेकदा अंजीरकडे दुर्लक्ष करतात. तर रोजच्या धावपळीतून फक्त दोन अंजीर खाल्ल्याने केवळ बद्धकोष्ठतेपासून आराम मिळत नाही, तर संपूर्ण आरोग्यालाही अनेक फायदे होतात.

रोज दोन अंजीर खाल्ल्यास हे आरोग्यदायी फायदे होतात

तज्ञांच्या मते, अंजीरमध्ये सॉल्यूबल आणि इंसोल्यूबल फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे अंजीरचे सेवन केल्याने शौचास लवकर होण्यास आणि शौच मऊ होण्यास मदत होते. दररोज सकाळी भिजवलेले अंजीर खाल्ल्याने पोटाच्या समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.

हाडे मजबूत करते – अंजीर हे लोह आणि कॅल्शियमचा देखील एक उत्कृष्ट स्रोत आहे. तज्ञांच्या मते,100 ग्रॅम अंजीरमध्ये अंदाजे 162 मिलिग्रॅम कॅल्शियम असते. कॅल्शियम हाडांची घनता वाढवण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते. दररोज दोन अंजीर खाल्ल्याने सांधेदुखीपासून आराम मिळू शकतो. शिवाय, त्यातील लोहाच्या प्रमाणामुळे चयापचय क्रिया सुधारते आणि हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

रक्तातील साखर नियंत्रित करा – अंजीरमध्ये अँटिऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखी आवश्यक पोषक तत्वे असतात. रोज अंजिरचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते आणि हृदयाचे आरोग्यही सुधारते. त्यामुळे जर तुम्हाला उच्च कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर अंजीर खाणे फायदेशीर ठरू शकते. एकंदरीत अंजीर हे एक सुपरफूड आहे. आहारात अंजीरचा नक्की समावेश करा. तथापि काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा

अंजीरचे स्वभाव खूप उष्ण असतात. त्यामुळे, ते खाण्यापूर्वी नेहमी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावेत. यामुळे त्यांची शक्ती वाढते आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळता येतात. तथापि अंजीर खाण्याच्या प्रमाणाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. तज्ञांच्या मते, दररोज 2 ते 3 अंजीर खाणे पुरेसे आहे. उन्हाळ्यात मात्र फक्त एक अंजीर खाणे फायदेशीर ठरते. तथापि जर तुम्हाला अंजीराचे पूर्ण फायदे हवे असतील, तर ते दररोज खावेत.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.) —————————————————————— —————————————————————— ——————————————————————

Follow Us
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?