AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाकवत भाजीने कोणते आजार बरे होतात? ही भाजी कोणी खाऊ नये ?

हिवाळा सुरू होताच बाजारात अनेक पालेभाज्या येतात. त्यात चाकवत भाजी देखील असते. ही भाजी केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.

चाकवत भाजीने कोणते आजार बरे होतात?  ही भाजी कोणी खाऊ नये ?
Chakavat / Bathua
| Updated on: Nov 16, 2025 | 10:16 PM
Share

चाकवत भाजी हिवाळ्यात भरपूर प्रमाणात बाजारात येत असते. चाकवत भाजीचा आहारात समावेश अनेक वर्षांपासून केला जात आहे.थंडीत खास करुन ही भाजी आवर्जून केली जाते. ही भाजी चवीला तर चांगली असतेच शिवाया शरीरालाही मजबूत बनवते. आयुर्वेदात या भाजीला नैसर्गिकपणे शरीर डिटॉक्स करणारी भाजी म्हटले जाते. चाकवत भाजीला चंदनबटवा आणि हिंदीत बथुआ म्हणतात. या भाजीचे गुणधर्म काय आणि कोणी ही भाजी खाऊ नये हे पाहूयात… चाकवत खाल्ल्याने कोणते आजार बरे होतात ?

चाकवत भाजीत विटामिन A, C, आयर्न आणि कॅल्शियम भरपूर असते. ही भाजी डायजेशन दुरुस्त करते. त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते. ज्या लोकांना गॅस, एसिडीटी आणि पोट फुगणे अशा तक्रारी असतील त्यांच्यासाठी ही भाजी औषधापेक्षा काही कमी नाही.

चाकवत रक्त देखील शुद्ध करते. त्वचेला चमकदार बनवते. शरीरातील विषारी टॉक्सिन्स बाहेर टाकते. जर तुम्हाला संधीवात, गुडघे दुखी, ब्लड प्रेशर तर ही भाजी फायदेशीर ठरते. थंडीत तुमच्या रोजच्या आहारात या भाजीचा समावेश केला तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. तसेच शरीरात उष्णताही वाढेल. मात्र चाकवत खाताना काही पथ्येही पाळावी लागतात.

चाकवतचा पराठाही खाल्ला जातो. थोड तूप टाकून जर गरमागरम चाकवतचा पराठा मिळाला तर याच्या सारखा पौष्ठीक नाश्ता नाही. ही भाजी पौष्ठीक आणि चवीलाही चांगली आहे.

कोणी चाकवत खाऊ नये ? ( Who should not eat Bathua?)

चाकवत भाजी ही उष्ण गुणधर्माची आहे. त्यामुळे ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी ही भाजी मर्यादित प्रमाणात खावी. कारण या भाजीत ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे किडनी किंवा मुतखडा होऊ शकतो.तसेच गर्भवती महिलांनी देखील ही भाजी डॉक्टरांना विचारुन खावी.

चाकवत बद्धकोष्ठतेसाठी चांगली ?

चाकवत भाजीत मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे मल त्यागताना मोठी मदत होते. पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता यात ही भाजी रामबाण आहे. पचनाच्या सर्व समस्या या भाजीमुळे दूर होतात.पचन यंत्रणा जर चांगली राखायची असेल तर चाकवत खाणे चांगले आहे.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.