AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी रिकाम्या पोटी कोणती फळे खाऊ नयेत, जाणून घ्या आहार तज्ज्ञांकडून

फळांचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहे, परंतु ती खाण्याच्या काही विशिष्ट वेळा असतात. आहारतज्ज्ञांच्या मते काही फळे कधीही रिकाम्या पोटी खाऊ नयेत. कोणती आहेत ही फळे त्याबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊयात.

सकाळी रिकाम्या पोटी कोणती फळे खाऊ नयेत, जाणून घ्या आहार तज्ज्ञांकडून
Fruits
| Edited By: | Updated on: Feb 25, 2026 | 8:25 AM
Share

तंदुरस्त आरोग्यासाठी फळांचे सेवन करणे हे अनेक फायद्याचे आहेत. प्रत्येकाने आपल्या आहारात काही फळांचा समावेश केला पाहिजे. ज्यामुळे आपले आरोग्य आणि शरीर निरोगी राहते. पण फळं सेवन करण्याची एक विशिष्ट वेळ देखील असते. काही लोकं रात्री फळे खातात, तर काही लोकं सकाळी रिकाम्या पोटी फळांचे सेवन करणे आरोग्यदायी मानतात. त्यातच असे काही फळे आहेत जी आरोग्यदायी आहेत मात्र सकाळी रिकाम्या पोटी त्यांचे सेवन करणे टाळावे. चला तर मग आजच्या लेखात आहारतज्ञांकडून अधिक जाणून घेऊयात.

आहारतज्ज्ञ सांगतात की सकाळी रिकाम्या पोटी फळं खाऊ शकतात, परंतु काही अशी फळं आहेत जी कधीही रिकाम्या पोटी खाऊ नयेत. कारण ही फळे फायद्याऐवजी तुमच्या आरोग्याचे नुकसान करू शकतात. सकाळी खाल्ल्याने ॲसिडिटी आणि गॅस होऊ शकतो. काही लोकांना पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

सकाळी रिकाम्या पोटी कोणती फळे खाऊ नयेत?

आहार तज्ञ सांगतात की सकाळी रिकाम्या पोटी लिंबूवर्गीय फळे खाणे टाळण्याचा सल्ला देतात. संत्र्यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये सायट्रिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते. यामुळे पोटातील आम्ल वाढू शकते, ज्यामुळे अपचनापासून ते गॅस आणि ॲसिडिटीपर्यंतच्या समस्या उद्भवू शकतात. ज्यांना आधीच पोटाच्या समस्या आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यावी. लिंबूवर्गीय फळे खाल्ल्याने अशा व्यक्तींना पचनाच्या समस्या वाढू शकतात.

केळी

केळी खूप ऊर्जा देणारे फळं असले तरी जेवणानंतर काही तासांनी ती खावीत. रिकाम्या पोटी केळी कधीही खाऊ नका. कारण केळीमध्ये असलेले मॅग्नेशियम आणि नैसर्गिक साखर शरीरात असंतुलन निर्माण करू शकते.

केळी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळीही झपाट्याने वाढू शकते. त्याचप्रमाणे आंबा हा फळ देखील कधीही रिकाम्या पोटी खाऊ नयेत. आंब्यामध्ये साखर असते. विशेषतः मधुमेहींसाठी रिकाम्या पोटी आंबे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.

फळे खाण्याची योग्य पद्धत कोणती?

रिकाम्या पोटी लिंबूवर्गीय फळे खाऊ नका

फळांसोबत दूध पिणे टाळा.

फळे नेहमी बारीक करून खावीत.

कापलेली फळे जास्त वेळ ठेऊन खाऊ नका.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली