Covid Vaccine on new variant | सध्याची उपलब्ध लस कोरोनाचा नवीन वेरिएंट JN1वर प्रभावी ठरेल का? एक्सपर्ट्सच मत काय?

Covid Vaccine on new variant | भारतात कोविडचा नवीन सब वेरिएंट जेएन.1 चा पहिला रुग्ण समोर आल्यानंतर कोविड रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. देशात कोविड रुग्णांची संख्या 2600 च्या पुढे गेली आहे. आता विद्यमान लस नव्या वेरिएंटवर प्रभावी ठरेल का? हे जाणून घेण आवश्यक आहे.

Covid Vaccine on new variant | सध्याची उपलब्ध लस कोरोनाचा नवीन वेरिएंट JN1वर प्रभावी ठरेल का? एक्सपर्ट्सच मत काय?
covid 19 vaccine
Follow us
| Updated on: Dec 21, 2023 | 1:42 PM

Covid Vaccine and new variant : अनेक महिन्यानंतर देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसची रुग्ण संख्या वाढू लागली आहे. एक्टिव रुग्णसंख्या वाढून 2669 झाली आहे. मागच्या एका आठवड्यात सक्रीय रुग्ण संख्येत सातत्याने वाढ झालीय. देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्यामागे JN1 हा नवीन वेरिएंट कारणीभूत आहे. या वेरिएंटमुळे पुन्हा एकदा कोरोनाच्या चिंतेने डोकवर काढल आहे. सरकारचे एक्सपर्ट्स, मायक्रोबायोलॉजी विभागाची टीम आणि जीनोम सीक्वेंसिंग करणाऱ्या लॅबमध्ये नव्या वेरिएंटवर काम सुरु आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जेएन 1 वेरिएंट ऑफ इंटरेस्ट मानलय, या वेरिएंटमुळे गंभीर धोका नाही असं म्हटलय. जगभरात रुग्ण संख्या वाढत असल्याने स्थिती सामान्य नाहीय.

सिंगापूरपासून अमेरिका आणि भारतात जेएन 1 वेरिएंटच्या केसेस वाढत चालल्या आहेत. सुरुवातीला या वेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. कोविड वायरस सतत आपल रुप बदलतोय असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलय. आता JN 1 वेरिएंट आलाय. हा BA.2.86 चा सब वेरिएंट आहे. भारतात कोविड रुग्ण संख्या वाढू लागल्यामुळे पुन्हा व्हॅक्सीनची चर्चा सुरु झाली आहे. लोकांच्या मनात प्रश्न आहे की, सध्या उपलब्ध असलेली व्हॅक्सीन कोरोनाचा नवीन वेरिएंट जेएन.1 प्रभावी ठरेल का?. या बद्दल एक्सपर्ट्सच मत काय जाणून घेऊया.

विद्यमान व्हॅक्सीन प्रभावी ठरेल का?

मॅक्स हॉस्पिटलचे इंटरनल मेडिसिन विभागाचे एचओडी डॉ. राजीव डांग यांनी TV9 शी बोलले जेएन वेरिएंट बऱ्याच केसेसमध्ये फ्लूसारखा आहे. WHO ने सुद्धा या व्हेरिएंटला गंभीर मानलेलं नाही. सध्या उपलब्ध असलेली कोविड लस नवीन सब वेरिएंट जेएन.1 रोखण्यात प्रभावी आहे, अशी WHO आणि CDC ने पृष्टी केली आहे. जेएन.1 वेरिएंट ओमिक्रॉनचा सब वेरिएंट आहे. सध्याची व्हॅक्सीन याचा प्रभाव कमी करु शकते.

व्हॅक्सीनेशनने हॉस्पिटलायजेशन आणि मृत्यू संख्येवर नियंत्रण ठेवता येऊ शकतं. कोविड वायरसमध्ये जो सतत बदल होतोय, त्यावरुन यूनिवर्सल वॅक्सीनवर सुद्धा काम सुरु आहे. भारत बायोटेकचे शास्त्रज्ञ अशा व्हॅक्सीनवर काम करत आहेत. जी सगळ्याच व्हेरिएंटवर प्रभावी ठरेल.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.