AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या ‘या’ सवयीमुळे खराब होईल तुमचे लिव्ह, त्या आजच बदला

आजकाल लिव्हरशी संबंधित आजार खूप वाढत आहेत. अशा परिस्थितीत, दरवर्षी 19 एप्रिल रोजी जागतिक यकृत दिन साजरा केला जातो, जेणेकरून त्याशी संबंधित आजारांबद्दल जागरूकता निर्माण करता येईल. म्हणूनच आज आपण तज्ञांकडून लिवर चांगले राहावे यासाठी कोणत्या हानिकारक सवयी बदल्या पाहिजे हे जाणून घेऊयात.

तुमच्या 'या' सवयीमुळे खराब होईल तुमचे लिव्ह, त्या आजच बदला
liver
| Edited By: | Updated on: Apr 26, 2025 | 12:01 AM
Share

आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक म्हणजे आपले लिवर. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी रक्तातील हानिकारक पदार्थ बाहेी काढून टाकण्याव्यतिरिक्त ते इतर अनेक कार्ये करते. अशा परिस्थितीत त्याचे आरोग्य आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. म्हणून तुमच्या काही सवयी बदला आणि निरोगी आयुष्य जगा. पण आजकाल अनेक प्रकारच्या समस्या वाढू लागल्या आहेत, ज्यामध्ये फॅटी लिवर, सिरोसिस आणि कर्करोग यासारख्या लिवरशी संबंधित समस्यांचा उद्भवत असतात. आजकाल अनेक लोक फॅटी लिवरच्या समस्येने त्रस्त आहेत.

हा असा आजार आहेत ज्यांची सुरुवातीची लक्षणे दिसत नाहीत आणि काही काळानंतर जेव्हा हा आजार वाढतो तेव्हा त्यावर उपचार करणे कठीण होते. अशा परिस्थितीत, या गंभीर समस्यांपासून स्वतःचे रक्षण करणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच, वाढत्या लिवरच्या आजारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यापासून बचाव कसा करावा हे सांगण्यासाठी दरवर्षी 19 एप्रिल रोजी जागतिक यकृत दिन साजरा केला जातो.

जास्त दारू पिल्याने यकृताचे नुकसान होते हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण याशिवाय आपल्या इतर अनेक सवयी आणि गोष्टी आहेत ज्या लिवरला नुकसान पोहोचवू शकतात. नकळत या सवयी पुन्हा पुन्हा केल्याने लिवरवर परिणाम होतो. चला तर मग आजच्या या लेखातुन आपण याबद्दल तज्ञांकडून जाणून घेऊया…

तज्ञ काय म्हणतात?

दिल्लीतील श्री बालाजी अ‍ॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटमधील मेडिकल अँड इंटरव्हेंशनल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी अँड हेपॅटोलॉजीच्या संचालक डॉ. मोनिका जैन यांच्या म्हणण्यानुसार आपल्या काही दैनंदिन वाईट सवयी लिवरचे हळूहळू नुकसान करू शकतात, जसे की जास्त तळलेले आणि प्रक्रिया केलेले अन्न खाणे, जास्त मद्यपान करणे, धूम्रपान करणे आणि डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे घेणे, या सर्व गोष्टी लिवरसाठी हानिकारक असू शकतात. याशिवाय कमी पाणी पिणे, रात्री उशिरापर्यंत जागे राहणे आणि लठ्ठपणा लिवरला नुकसान पोहोचवू शकतो.

यकृत निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही नेहमी संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे सर्वात महत्वाचे आहे, कारण यामुळे शरीराला सर्व प्रकारचे जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वे मिळतील. तसेच तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळे, मोड आलेले धान्य, लिंबू, आवळा, हळद आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. याशिवाय, जास्त तळलेले आणि मसालेदार अन्न, जास्त साखर, मीठ, मांस आणि थंड पेये यापासून दूर रहा. यासोबतच, लिवरला डिटॉक्स करण्यासाठी, कोमट पाणी पिणे, नियमित व्यायाम करणे आणि ताण कमी करणे महत्वाचे आहे. दररोज किमान 7 ते 8 तासांची योग्य झोप घ्या जेणेकरून शरीराला स्वतःचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.

याशिवाय वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी जेणेकरून लिवरची कोणतीही समस्या आधीच ओळखता येईल आणि त्यावर वेळेत उपचार सुरू करता येतील. जर या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर लिवरशी संबंधित या समस्या टाळता येतात. म्हणून, आजच तुमच्या या सवयी सुधारा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.