AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चार दिवसात सात मोठ्या कंपन्यांचे 1.75 लाख कोटी बुडाले, शेअरबाजाराला इराण युद्धाचा फटका

इराणचे युद्ध सुरु असताना शेअरबाजारात मोठ्या घडामोडी होत आहेत. गेल्या आठवड्यात चार कामकाजाच्या दिवसात सात मोठ्या कंपन्यांचे 1.75 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. सर्वात जास्त तोटा रिलायन्सला झाला आहे.

चार दिवसात सात मोठ्या कंपन्यांचे 1.75 लाख कोटी बुडाले, शेअरबाजाराला इराण युद्धाचा फटका
SHARE MARKET
| Updated on: Mar 29, 2026 | 6:31 PM
Share

अमेरिका आणि इराणच्या युद्धाला एक महिना पूर्ण होत आला आहे. रोज युद्धाच्या घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होऊ लागला आहे. युद्ध जसजसे पुढे जात आहे तसतसे स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावणाऱ्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या आठवड्यात केवल चार कामकाजाच्या दिवसातच गुंतवणूकदारांचे १.७५ लाख कोटी स्वाहा झाले आहेत. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरवाल्या सेन्सेक्सच्या टॉप-१० कंपन्यांपैकी ७ कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. आणि सर्वाधिक नुकसान मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि एसबीआयला झाला आहे.

इराण युद्ध संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत आणि भारतासह जगभरातील शेअर बाजारांवर याचा परिणाम दिसत आहे. भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात BSE Sensex 949.74 अंश वा 1.27 टक्के घसरला. तर NSE Nifty मध्ये 294.9 अंश वा 1.27 टक्के घसरण नोंद झाली. मार्केट व्हॅल्यूच्या बाबतीत देशाच्या सर्वात मोठ्या कंपन्यांचा विचार करता टॉप-10 पैकी सात कंपन्यांचे मार्केट कॅप घटले आहे. तर तीन कंपन्या ग्लोबल टेन्शनमध्येही गुंतवणूकदाराची कमाई करण्यात यशस्वी झाल्या.

टॉप-3 लूझर कंपन्या कोणत्या ?

गेल्या आठवड्यात रामनवमीच्या मुहूर्तावर शेअर बाजारात क्लोजिंग होते. त्यामुळे चार दिवसच कामकाज झाले. या चार कामकाजाच्या दिवसात देशाच्या सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या नेतृ्त्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप घटून 18.24 लाख कोटी रुपयांवर आले आहे. कंपनीच्या गुंतवणूकदारानी 89,720 कोटी रुपये गमावले. दुसऱ्या क्रमांकावर HDFC Bank राहीली आणि तिचे मार्केट कॅपिटल 37,249 कोटी रुपयांनी घसरुन 11.64 लाख कोटी रुपये राहिले आहे. नुकसान करण्यात तिसऱ्या नंबरवर देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय होती. एसबीआयचे मार्केट कॅप 35,399 कोटी रुपये कमी होऊन 9.42 लाख कोटी रुपयांवर आले.

या कंपन्यांनीही केले नुकसान –

रिलायन्स, एचडीएफसी बँक आणि एसबीआय शिवाय आपल्या गुंतवणूकदारांचे नुकसान करणाऱ्या अन्य कंपन्यांचा विचार करायचा झाला तर…

कंपनी मार्केट कॅप तोटा
ICICI Bank  8.83 लाख कोटी रुपये 8,122 कोटी रुपये
Bharti Airtel  10.50 लाख कोटी रुपये 2,480 कोटी रुपये
HUL 4.87 लाख कोटी रुपये  2,091 कोटी रुपये
TCS  8.67 लाख कोटी रुपये 271 कोटी रुपये

बाजारात भूकंप तर येथे कमाई –

जेथे सेंसेक्सच्या सात टॉप कंपन्यांनी गुंतवणूकदारांचा तोटा केला आहे. तसेच तीन कंपन्यांच्या शेअरमध्ये पैसे लावणाऱ्यांचा मात्र फायदा झाला आहे. LT च्या मार्केट कॅप 18,052 कोटी रुपयांच्या वाढीसह 4.90 लाख कोटी झाला आहे. तर बजाज फायनान्सची मार्केट व्हॅल्यूत 8,680 कोटी रुपयांच्या उसळी आली आणि ती 5.25 लाख कोटी रुपये झाली आहे. याशिवाय दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसची मार्केट व्हॅल्यू 6,245 कोटी रुपयांच्या वाढीसह 5.15 लाख कोटी रुपये झाली आहे.

नुकसान होऊनही RIL चा दबदबा –

भले गेल्या आठवड्यात रिलायन्सला मोठा घाटा झाला असला तरी मार्केट व्हॅल्यूच्या हिशेबाने देशाच्या सर्वात मोठी कंपन्यांच्या लिस्टमध्ये पहिल्या पायरीवर आहे. यानंतर अनुक्रमे HDFC Bank, Bharti Airtel, SBI, ICICI Bank, TCS, Bajaj Finance, Infosys, LT आणि HUL चे स्थान राहिले आहे. इराण युद्धाने शेअर बाजारातील गुंतवणूकदार धास्तावले आहेत.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय