Rakesh Kishore Attacked : माजी सरन्यायाधीशांवर बूट भिरकावणाऱ्या राकेश किशोरला चपलेने मारहाण, व्हिडीओ तुफान व्हायरल!
देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट भिरकावणाऱ्या राकेश किशोर या वकिलाला चपलेने मारहाण करण्यात आली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Rakesh Kishore Attacked : देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर कोर्टरुममध्येच बुट फेकण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. राकेश किशोर नावाच्या वकिलाने ऑक्टोबर महिन्यात हे दृष्कृत्य केले होते. या घटनेचे पडसाद देशभरात उमटले होते. सामाजिक कार्यकर्ते, विद्वान, बुद्धीजीवींनी या घटनेचा निषेध केला होता. थेट सरन्यायाधीशांच्या दिशेने बुट फेकण्याचा हा प्रकार गंभीर असून भारतीय न्यायसंस्थेचा अवमान करण्याचाच हा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया तेव्हा व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, आता याच राकेश किशोर याला न्यायालयाच्या परिसरातच काही वकिलांनी इंगा दाखवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या वकिलाला थेट चपलेने मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्या वकिलावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिल्लीतील करकडडूमा कोर्ट परिसरात घडली घटना घडली आहे. त्याला काही वकिलांनी थेट चपेलेने मारहाण केली आहे. राकेश किशोर करकडडूमा न्यायालय परिसरात आला होता. यावेळी त्याला काही वकिलांनी घेरलं आणि मारहाण केली. त्यानंतर न्यायालय परिसरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून राकेश किशोर याला बाहेर काढले.
व्हिडीओमध्ये नेमकं काय दिसत आहे?
या घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राकेश किशोर काळा कोट आणि पांढऱ्या पॅन्टमध्ये दिसतोय. वकिली गणेवशात तो आहे. काही वकील त्याला चपलेने मारहाण करत आहेत. तर राकेस किशोर हा मला तुम्ही का मारत आहात? असे विचारत आहे. त्यानंतर काही वेळाने तो ‘सनातन धर्म की जय’ असे म्हणताना दिसत आहे.
दरम्यान, आता राकेश किशोर याला मारहाण झाल्यानंतर समाजमाध्यमावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. हिंसेला हिंसेनेच प्रत्युत्तर देऊ नये, असे मत काही लोकांनी व्यक्त केले आहे. तर राकेश किशोर याला चपलेने मारले ते योग्यच केले असेही काही लोक म्हणत आहेत. दरम्यान, आता या प्रकरणी नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
