पाकिस्तानला ‘वेश्यालय’ म्हणणाऱ्या अफगाण अधिकाऱ्याकडून नवाज शरीफांची भेट, मोदींचा संदेश दिल्याचा आरोप का?

पाकिस्तानला वेश्यालय म्हणणाऱ्या अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्लाह मोहिब (Hamdullah Mohib) यांनी लंडनमध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरिफ यांची भेट घेतलीय.

पाकिस्तानला ‘वेश्यालय’ म्हणणाऱ्या अफगाण अधिकाऱ्याकडून नवाज शरीफांची भेट, मोदींचा संदेश दिल्याचा आरोप का?
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 6:24 PM

Afghanistan NSA Meets Nawaz Sharif काबुल : पाकिस्तानला वेश्यालय म्हणणाऱ्या अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्लाह मोहिब (Hamdullah Mohib) यांनी लंडनमध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरिफ यांची भेट घेतलीय. त्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांचा चांगलाच जळफळाट झालाय. विशेष म्हणजे हमदुल्लाह मोहिब मागील काही काळापासून पाकिस्तानवर सडकून टीका करत आहेत. त्यांनी पाकिस्तानवर तालिबानला मदत केल्याचाही आरोप केलाय. त्यानंतर इम्रान खान यांच्या मंत्र्यांनी त्यांना थेट लक्ष्य केलंय. आता नवाज शरिफ यांच्या भेटीनंतर मोहिब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश शरिफ यांना दिल्याचा आरोप इम्रान खान यांचे राजकीय सल्लागार शाहबाज गिल (Shahbaz Gill) यांनी केलाय.

हमदुल्लाह मोहिब सातत्याने पाकिस्तान सरकारला लक्ष्य करत आहेत. त्यामुळे इम्रान खान यांचे मंत्री मोहिब यांना सर्वात मोठा शत्रू मानत आहेत. आता त्यांनी इम्रान यांच्या विरोधकांची भेट घेतल्यानं पाकिस्तानमध्ये चर्चेला उधाण आलंय. मोहिब शरिफ यांच्यासोबत मिळून काही राजकीय योजना करत असल्याचंही बोललं जातंय. पाकिस्तान सरकारने अफगाणिस्तावर टीका करण्यास सुरुवात केल्यानंतर मोहिब आणि राज्य मंत्री सैय्यद सादत नदेरी (Syed Saadat Naderi) यांनी लंडनमध्ये शरिफ यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय.

अफगाण अधिकाऱ्याने शरिफ यांना पंतप्रधान मोदींचा संदेश दिला?

इम्रान खान यांचे राजकीय सल्लागार शाहबाज गिल यांनी मोहिब आणि शरिफ यांच्या भेटीवरच प्रश्न उपस्थित केलेत. तसेच या भेटीमागे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात असल्याचा दावा केलाय. त्यांनी ट्विट करत म्हटलं, “नवाज शरीफ यांनी पाकिस्तान विरोधात बोलणाऱ्या अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्याची भेट घेतलीय. मोहिब यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश देण्यासाठी नवाज शरीफ यांची भेट घेतली. पाकिस्ताना व्याप्त काश्मीरमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यात वाद तयार करण्यासाठीच ही भेट झालीय.”

पाकिस्तानवर तालिबानला मदत करण्याचा आरोप

अफगाणिस्तान, भारत आणि नवाज शरिफ पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरमध्ये अडचणी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, असाही आरोप करण्यात येतोय. अफगाणिस्तानने याआधी 15 हजार नवे तालिबानी कट्टरतावाद्यानी अफगाणिस्तानमध्ये घुसखोरी केल्याचा आणि यातील 10 हजार पाकिस्तानमधून (Pakistan Helps Taliban in Afghanistan) आल्याचा आरोप केलाय. अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपतींनी देखील पाकिस्तान हवाई दलावर तालिबानला मदत करण्याचा आरोप केलाय.

हेही वाचा :

अफगानिस्तानच्या पहिल्या उपराष्ट्रपतींकडून खास फोटो शेअर, पाकिस्तानची आगपाखड

भाजप आणि आरएसएसची विचारसरणी भारतासाठीच धोकादायक, POK मधील निवडणूक सभेत इम्रान खान यांची टीका

Pakistan: तालिबान्यांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, 15 जवानांचा मृत्यू, 63 जणांचं अपहरण

व्हिडीओ पाहा :

Afghanistan NSA Meets Nawaz Sharif allegation on PM Modi about Jammu Kashmir

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.