Explainer : 4 वर्षांत 4 देशातली सत्ता उलथवून लावली, भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये काय काय घडलं?
नेपाळमध्ये तरुणांनी एकत्र येत तेथील सरकार उलथवून लावले आहे. या उठावाच्या निमित्ताने आता गेल्या चार वर्षात चार देशाांत झालेल्या सत्तांतराची चर्चा होत आहे. गेल्या चार वर्षात बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि आता नेपाळ या चार देशांत सत्तांतर झाले.

Nepal Violence : भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये सध्या अराजक माजले आहेत. बोकाळलेला भ्रष्टाचार आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या देशातील तरुणाई रस्त्यावर उतरली. नेपाळच्या या आंदोलनाला जेन झी आंदोलन म्हटले जात आहे. तरुणांचा संतापामुळे या देशात थेट सत्तापालट झाले आहे. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना थेट राजीनामा द्यावा लागलाय. विशेष म्हणजे राष्ट्रपतींनीही राजीनामा देत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. दरम्यान, आता नेपाळमधील या उठावामुळे भारताच्या शेजारी असलेल्या काही देशांतील अराजकांची चर्चा होत आहे. गेल्या चार वर्षांत भारताच्या शेजारी असलेल्या चार देशांमध्ये सत्तापालट झाले आहे. हे देश कोणते आहेत? इथे सत्ता का उलथवून लावण्यात आली होती? हे जाणून घेऊ या… ...
