Saudi Arabia-Pakistan : डिफेन्स डीलनंतर सौदी अरेबियाकडून पाकिस्तानला दुसरं मोठं गिफ्ट, एकाचवेळी 30 लाख लोकांचं नशीब पालटणार
Saudi Arabia-Pakistan : सौदी अरेबियाने अलीकडेच पाकिस्तानसोबत एक सुरक्षा करार केला होता. त्यामुळे सौदीला अणवस्त्रांच सुरक्षा कवच मिळालं. आता सौदीने पाकिस्तानला रिर्टन गिफ्ट दिलं आहे. त्यामुळे पाकिस्तानात 30 लाख लोकांच नशीब पालटणार आहे.

डिफेन्स डीलनंतर पाकिस्तानला सौदी अरेबियाकडून मोठं गिफ्ट मिळालं आहे. सौदीची कंपनी Go Ai Hub ने पाकिस्तानात गुंतवणूकीची घोषणा केली आहे. त्या अंतर्गत पाकिस्तानात टेक्निकल प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येईल. ही कंपनी पाकिस्तानी नागरिकांना AI ची माहिती देईल. द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, कंपनी पहिल्या फेजमध्ये कमीत कमी 50 हजार पाकिस्तानी नागरिकांना ट्रेन करण्याची योजना बनवत आहे. सुरुवातीला 1000 पाकिस्तानी नागरिकांना नोकरी देण्याची तयारी आहे. रिपोर्टनुसार, येणाऱ्या वेळेत पाकिस्तानात AI सेक्टरमध्ये ज्या 30 लाख नोकऱ्या देण्याची योजना बनवण्यात आली आहे, ते पूर्ण करण्याचं काम ही कंपनी करेल.
पाकिस्तानने जेव्हापासून सौदी अरेबियासोबत डिफेन्स डील केली आहे, तेव्हापासून त्यांची इच्छा गुंतवणूकीची आहे. पाकिस्तानला हेल्थ, कम्युनिकेशन आणि अन्य सेक्टरमध्ये रियादसोबत डील हवी आहे. अलीकडेच सौदीने हेल्थ सेक्टरमध्ये गुंतवणूकीची योजना असल्याच म्हटलं होतं. पण Go Ai Hub ने आधीच गुंवतणूकीची घोषणा केली आहे. Go Ai Hub सौदीची एक कंपनी आहे. त्याचं मुख्यालय रियाद येथे आहे.
बसल्याजागी अणवस्त्र सुरक्षा कवच मिळालं
पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने सप्टेंबर 2025 मध्ये एक डिफेन्स डील केली. त्या अंतर्गत कुठल्या एका देशावर हल्ला झाल्यास तर तो दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल. कतरवरील इस्रायली हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने पाकिस्तानसोबत डील केली. या करारानंतर सौदी अरेबियाला बसल्याजागी अणवस्त्र सुरक्षा कवच मिळालं. पाकिस्तान जगातील एकमेव मुस्लिम देश आहे, ज्यांच्याकडे अणूबॉम्ब आहे. सिपरीनुसार, पाकिस्तानकडे जवळपास 170 अणवस्त्रे आहेत. असं म्हणतात की, सौदी अरेबियाकडून गुंतवणूकीसाठी पाकिस्तानने त्यांना अणवस्त्र सुरक्षाकवच दिलं आहे.
सैनिकांवर सतत हल्ले सुरु
पाकिस्तानची सध्याची हालत खूप खराब आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. फायनान्ससाठी ते जागतिक बँकेवर अवलंबून आहेत. मोठ्या प्रमाणावर दहशतवाद, बेरोजगारी आहे. याला त्यांची स्वत:ची धोरणं जबाबदार आहे. खैबर पख्तूनख्वा, बलूचिस्तान या भागात मोठ्या प्रमाणात दहशतवाद आहे. तिथे सैनिकांवर सतत हल्ले सुरु आहेत.
