AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा एक निर्णय आणि पाकिस्तान हादरला, थेट पाकिस्तानच्या नेत्यांसोबत ते लष्करापर्यंत सर्वच..

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात भूमिका घेतली. पहिल्याच दणक्यात भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. एका मागून एक मोठे दणके भारताने पाकिस्तानला दिली. त्यामध्येच आता मोठी माहिती पुढे येत आहे.

भारताचा एक निर्णय आणि पाकिस्तान हादरला, थेट पाकिस्तानच्या नेत्यांसोबत ते लष्करापर्यंत सर्वच..
Indus Water Treat
| Updated on: Jul 07, 2026 | 12:49 PM
Share

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कायमच तणावात राहिली आहेत. त्यामध्येच पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आक्रमक भूमिकेत दिसला. भारताने ताबडतोब सिंधु जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. भारताने पाकिस्तानचे पाणी बंद केले. आता पाकिस्तान भीकेला लागला आहे. पाकिस्तानचा मोठा भाग याच पाण्यावर अवलंबून आहे. भारताने पाणी बंद केल्याने पिण्याचे पाणी आणि शेतीच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न पाकिस्तान पुढे उभा आहे. भारताने पहलगाममधील हल्ल्यानंतर 1960 चा सिंधु जल करार स्थगित केला. यादरम्यान पाकिस्तानला भारताने हा करार रद्द केल्याने वेढ लागले. नुकताच पाकिस्तानी सैन्याने मोठे विधान केले.

सेना प्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्या अध्यक्षतेच्या खाली झालेल्या 276 कोर कमांडर्स कॉन्फ्रेंसमध्ये हा संकल्प घेण्यात आला की, सरकारच्या निर्देशानुसार आणि पाकिस्तानी जनतेच्या अपेक्षांनुसार, देशाच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी सर्व पाऊस उचलली जातील. पाकिस्तानचे हक्काचे पाणी रोखले तर युद्ध कारवाई मानली जाईल. कोर कमांडर्सने सुरक्षा स्थितीची समिक्षा करत पाकिस्तानी सशस्त्र सैन्याच्या संचालन क्षमता आणि युद्ध तैयारीबद्दल भाष्य केले.

बैठकीमध्ये अफगान तालिबान नियंत्रण आंतकवादी संघटनांकडून पाकिस्तानमध्ये केल्या जाणाऱ्या हल्ल्यांबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली. 2 जुलै रोजी पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी म्हटले की सिंधु जल संधी करार स्थगित केल्याने पाकिस्तानच्या हिस्स्याचे पाणी रोखले जात आहे. दहशतवादी कारवाईंचे खोटे आरोप केले जात आहेत, हे अजिबात स्वीकारले जाणार नाही.

त्यांनी मोठा आरोप करत पुढे म्हटले की, हे मुळात स्पष्ट झाले पाहिजे की, खरोखरच दहशतवाद हाच मुद्दा आहे का? इस्लामाबादमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना उपप्रधानमंत्री इसहाक डारने बोलताना म्हटले की, पाकिस्तान सिंधु जल करार रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयाविरोधात आहे. हा करार वैध आणि प्रभावीपणे तयार करण्यात आला. कोणताही एक पक्ष असा निर्णय घेऊ शकत नाही. सिंधु जल करारावरील स्थिगिती उठवण्यासाठी पाकिस्तानकडून अनेक प्रयत्न केली जात आहेत.

Follow Us
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका