AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : भारताच्या भितीपोटी अखेर पाकिस्तानला घ्यावा लागला एक मोठा निर्णय, शहबाज शरीफ यांची घोषणा

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारताने पाकिस्तानला खूप धोपटलं. चार दिवसांच्या लढाईत पाकिस्तानची अशी हालत करुन टाकली की, पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली. पाकिस्तानला आपली हतबलता कळून आली. त्यामुळे अखेर त्यांना नाईलाजाने एक पाऊल उचलावं लागलय. पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी घोषणा केली आहे.

Operation Sindoor : भारताच्या भितीपोटी अखेर पाकिस्तानला घ्यावा लागला एक मोठा निर्णय, शहबाज शरीफ यांची घोषणा
| Updated on: Aug 14, 2025 | 10:17 AM
Share

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला भारताच्या सैन्य ताकदीचा अंदाज आला आहे. सध्या पाकिस्तान आपली सैन्य क्षमता मजबूत करण्याच्या मागे लागला आहे. पाकिस्तानतचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इस्लामाबादमध्ये आयोजित ‘मार्का-ए-हक’ सेरेमनी दरम्यान नव्या पाकिस्तान आर्मी रॉकेट फोर्स कमांडच्या स्थापनेची घोषणा केली. पाकिस्तानचा हा नवीन सैन्य विभाग पारंपरिक (कन्वेंशनल) मिसाइल आणि रॉकेट तैनातासाठी बनवला जात आहे. यात प्रामुख्याने फतह सीरीजसह अन्य मिसाइल्स सिस्टिमचा समावेश असेल. ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेला दारुण पराभव आणि भारताच्या वाढत्या मिसाइल क्षमतेमुळे पाकिस्तानला नाईलाजाने हे पाऊल उचलावं लागलय. पाकिस्तानची ही नवीन रॉकेट फोर्स पाकिस्तानच्या सध्याच्या आर्मी स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडला (ASFC) समांतर काम करेल. यात अणवस्त्रांशिवाय पारंपारिक मिसाइल आणि रॉकेट्स असतील.

भारताकडे लांब पल्ल्याचे ब्रह्मोस, पृथ्वी आणि अग्नि सीरीजचे मिसाइल्स आहेत. त्या तुलनेत आपली सुद्धा तशी क्षमता असावी, हा पाकिस्तानचा रॉकेट फोर्स स्थापनेमागचा उद्देश आहे. पाकिस्तानने उचलेलं हे पाऊल म्हणजे सैन्य रणनितीमधील बदल या दृष्टीने त्याकडे पाहिलं जातय. ऑपरेशन सिंदूरच यश ही भारताची बदलेली सैन्य रणनिती आहे. पाकिस्तानला जशास तसं उत्तर देणाऱ्या या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने आपलं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केलं. भारतीय सैन्याने यामध्ये मिसाइल्स, अचूक टार्गेट आणि अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केला.

ऑपरेशन सिंदूरनंतरही भारताच हे काम सुरु

ही शस्त्रास्त्र वापरुन भारताने पाकिस्तानला धूळ चारली. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने सगळ्या जगाला दाखवून दिलं की, आता तो जुना भारत राहिलेला नाही. या नव्या भारताची संरक्षण सिद्धता पहिल्यापेक्षा कैकपटीने अधिक आहे. ऑपरेशन सिंदूरनंतरही भारताने आपली संरक्षण क्षमता अधिक बलवान करण्यासाठी पावलं उचलली आहेत.

त्यावेळी कळली भारताची ताकद

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला केला होता. यात 25 पर्यटकांसह 26 भारतीयांचा मृत्यू झालेला. याच भ्याड हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलेलं. पाकिस्तानात दहशतवादी तळांवर अचूक प्रहार करुन 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले. या ऑपरेशननंतर भारताच्या शत्रुंना भारतीय सैन्याच्या ताकदीची कल्पना आली.

चिनी माल कुचकामी ठरला

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत-पाकिस्तानमध्ये चार दिवस लढाई चालली. भारताने पाकिस्तानी एअर फोर्सला सर्वात मोठा दणका दिला. त्यांची विमानं पाडली. एअरबेस उडवले. पाकिस्तानला पुढची बरीच वर्ष लक्षात राहिलं असं हे ऑपरेशन होतं. पाकिस्तानी सैन्याने या लढाईत चिनी बनवाटीची शस्त्र वापरलेली. चिनी माल किती कुचकामी आहे हे चार दिवसाच्या लढाईत सगळ्या जगाला कळलं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.