AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जागतिक संस्कृत परिषद नेपाळमध्ये संपन्न, अनेक विद्वानांनी घेतला सहभाग

नेपाळमधील काठमांडू येथे जागतिक संस्कृत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दर तीन वर्षांनी विविध देशांमध्ये ही परिषद भरवली जाते. यात जगभरातील हजारो विद्वान एकत्र येतात.

जागतिक संस्कृत परिषद नेपाळमध्ये संपन्न, अनेक विद्वानांनी घेतला सहभाग
Sanskrit Conference
| Updated on: Jul 12, 2025 | 8:40 PM
Share

यंदा नेपाळमधील काठमांडू येथे जागतिक संस्कृत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही संस्कृत भाषेसाठी समर्पित एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परिषद आहे, यात जगातील सर्वात प्राचीन आणि गूढ भाषेचा उत्सव साजरा केला जातो. दर तीन वर्षांनी विविध देशांमध्ये ही परिषद भरवली जाते. यात जगभरातील हजारो विद्वान एकत्र येतात. या परिषदेत ते संस्कृत भाषा, साहित्य आणि तत्त्वज्ञानावरील संशोधन सादर करतात आणि त्यावर सखोल चर्चा करतात.

यंदाच्या 5 दिवसीय परिषदेचे उद्घाटन नेपाळच्या राष्ट्रपतींनी केले. भगवान स्वामीनारायण यांचे नेपाळसोपत पवित्र नाते आहे. त्यामुळे अक्षर-पुरुषोत्तम दर्शन जे भगवान स्वामीनारायण यांनी सांगितलेल्या वेदांत तत्वज्ञानावर आधारित आहे. याबाबत एक विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते.

1790 च्या दशकात स्वामीनारायण यांनी जवळपास तीन वर्षे नेपाळमध्ये प्रवास केला होता. या प्रवासात त्यांनी तपश्चर्या, योगाभ्यास आणि दिव्य ज्ञानाद्वारे नेपाळच्या भूमीला पावन केले. याच काळात त्यांनी अक्षर-पुरुषोत्तम दर्शनाचे मूलभूत सिद्धांत सांगितला होता, जी आज एक मान्यताप्राप्त वेदांत शाखा आहे. 28 जून रोजी भरवलेल्या या विशेष सत्रात नेपाळ, भारत, अमेरिका, चीन, जपान तसेच अनेक युरोपीय देशांतील विद्वान सहभागी झाले होते.

या सत्राचे अध्यक्ष महामहोपाध्याय स्वामी भद्रेशदास होते, जे स्वामीनारायण भाष्यचे लेखक आणि वेदांताचे जागतिक कीर्तीचे अभ्यासक आहेत या सत्रात पुढील मान्यवर सहभागी झाले होते.

  • श्री काशीनाथ न्यौपाने – जागतिक संस्कृत परिषदेचे राष्ट्रीय समन्वयक व नेपाळचे नामांकित संस्कृत विद्वान
  • प्रो. श्रीनिवास वरखेदी – कुलगुरू, सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी, दिल्ली
  • प्रो. मुरली मनोहर पाठक – कुलगुरू, लाल बहादूर शास्त्री नॅशनल संस्कृत युनिव्हर्सिटी, दिल्ली
  • प्रो. जी.एस. मूर्ती – कुलगुरू, सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी, तिरुपती
  • प्रो. भाग्येश झा – नामवंत संस्कृत अभ्यासक आणि माजी IAS अधिकारी
  • प्रो. सुकांत सेनापती – कुलगुरू, श्री सोमनाथ संस्कृत विद्यापीठ, गुजरात
  • प्रो. राणी सदाशिव मूर्ती – कुलगुरू, वैदिक युनिव्हर्सिटी, तिरुपती
  • प्रो. हरेराम त्रिपाठी – कुलगुरू, कवीकुलगुरू कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी, नागपूर
  • प्रो. रामसेवक दुबे – कुलगुरू, जगद्गुरु रामानंदाचार्य राजस्थान संस्कृत युनिव्हर्सिटी
  • प्रो. विजय कुमार सी.जी. – कुलगुरू, महर्षी पाणिनि संस्कृत व वैदिक युनिव्हर्सिटी, उज्जैन
  • प्रो. रामनारायण द्विवेदी – महासचिव, काशी विद्वत परिषद
  • डॉ. सच्चिदानंद मिश्र – सदस्य सचिव, भारतीय तत्त्वज्ञान संशोधन परिषद (ICPR)

नेपाळमधील काही प्रमुख संस्थांचे प्रतिनिधीही या सत्रात सहभागी झाले होते. यात नेपाळ संस्कृत युनिव्हर्सिटी, राष्ट्रीय धर्म जागरण अभियान, जयतु संस्कृतम्, नेपाळ शिक्षण परिषद, नेपाळ पंचांग निर्णयक विकास समिती, नेपाळ पंडित महासभा, नेपाळ महर्षी वैदिक फाउंडेशन आणि वाल्मिकी विद्यापीठ यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.

या सत्राद्वारे नेपाळमध्ये पहिल्यांदाच शास्त्रीय पातळीवर अक्षर-पुरुषोत्तम दर्शनाची औपचारिक ओळख झाली. या ऐतिहासिक प्रसंगी परम पूज्य महंत स्वामी महाराजांनी आपल्या व्हिडिओ संदेशाद्वारे संपूर्ण परिषदेच्या यशासाठी प्रार्थना केली. या सत्रात खालील विद्वानांनी आपले शोधनिबंध सादर केले.

  • प्रो. डॉ. आत्मतृप्तदास स्वामी: 21 व्या शतकातील संस्कृत साहित्यामध्ये प्रस्थानत्रयीवरील स्वामीनारायण भाष्यांची रचना प्रक्रिया
  • प्रो. डॉ. अक्षरानंददास स्वामी: भगवद्गीतेतील धर्म या विषयाचे अक्षर-पुरुषोत्तम दर्शनातून विश्लेषण
  • प्रो. आचार्य ब्रह्मानंददास स्वामी: परब्रह्म भगवान स्वामीनारायण प्रकट केलेल्या अक्षर-पुरुषोत्तम दर्शनातील अवतार संकल्पना
  • प्रो. डॉ. ज्ञानतृप्तदास स्वामी: भगवान स्वामीनारायण यांच्या वचनामृतातील अक्षर-पुरुषोत्तम दर्शन
  • प्रो. डॉ. सागर आचार्य: अक्षरब्रह्माच्या दृष्टिकोनातून स्वामीनारायण भाष्यांची तात्त्विक रचना
  • प्रो. आचार्य तरूण धोलाः अक्षर-पुरुषोत्तम दर्शनानुसार ब्रह्म-परब्रह्म नाते
  • प्रो. आचार्य हरीकृष्ण पेडदिया: गीता भाष्यामधील ब्रह्म-आत्म एकता – अक्षर-पुरुषोत्तम दृष्टिकोनातून विश्लेषण
  • आचार्य तेजस कोरिया: विशिष्टाद्वैत आणि अक्षर-पुरुषोत्तम दर्शन यांमधील ‘अक्षर’ संकल्पनेची तुलनात्मक मांडणी (भगवद्गीतेच्या आधारावर)

या सत्रात भाषण करताना प्रो. श्रीनिवास वरखेदी यांनी भगवान स्वामीनारायण प्रकट केलेल्या अक्षर-पुरुषोत्तम सिद्धांताचे वेदांत परंपरेतील योगदानाचा उल्लेख केला. तसेच सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी या वर्षापासून आपल्या अभ्यासक्रमात हा सिद्धांत समाविष्ट करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

महामहोपाध्याय स्वामी भद्रेशदास यांनी समारोपाच्या भाषणात, नेपाळची पावन भूमी, भगवान स्वामीनारायण यांचा प्रवास आणि त्यांनी सांगितलेले दिव्य तत्त्व अधोरेखित केले. सनातन वैदिक परंपरेचा हा अखंड प्रवाह आजही नवीन तात्त्विक विचारांना जन्म देत आहे असं ते म्हणाले. यानंतर या परिषदेची सांगता झाली.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.