AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Osama Bin Laden : कुटुंब आहे की अख्खा जिल्हा? 52 बहिण-भाऊ, 14 पोरं अन् 6 बायका… दहशतवादी लादेनचा परिवार ठरतोय चर्चेचा विषय

Osama Bin Laden : अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवरवर हल्ला करून ओसामा बिन लादेन याने जगाला मोठा धक्का दिला होता. शोध घेऊन त्याचा खात्मा करणे अमेरिकेसाठी मोठे आव्हान होते. त्याला पाकिस्तानातील एबटाबादमध्ये अमेरिकेने ठार केले. आता ओसामाच्या कुटुंबाची चर्चा होत आहे.

Osama Bin Laden : कुटुंब आहे की अख्खा जिल्हा? 52 बहिण-भाऊ, 14 पोरं अन् 6 बायका... दहशतवादी लादेनचा परिवार ठरतोय चर्चेचा विषय
ओसामा बिन लादेन Image Credit source: गुगल
| Updated on: May 02, 2025 | 2:24 PM
Share

अल कायद्याचा म्होरक्या आणि दहशतवादी ओसाम बिन लादेन याने अमेरिकेला हादरवून सोडले होते. त्याने 9/11 हा दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवरवर हल्ला केला होता. त्यात अनेक निरपराध अमेरिकन मारल्या गेले होते. या हल्ल्यानंतर अमेरिकेने त्याला 2 मे 2011 रोजी पाकिस्तानच्या एबटाबादमध्ये ठार केले होते. विशेष त्याच्या कुटुंबानेच त्याला ठार मारण्यासाठी मदत केली होती. काय होता तो प्लॅन?

17 वा सैतान

ओसामा बिन लादेन याचे पूर्ण नाव ओसामा बिन मुहम्मद बिन अवद बिन लादेन इतके लांबलचक होते. त्याचा जन्म सौदी अरबमध्ये 10 मार्च 1957 रोजी झाला होता. त्याला 52 भाऊ-बहिण होते. लादेन हा त्याच्या आई-वडिलांचे 17 वे अपत्य होता. त्याच्या वडिलांचा सौदी अरबमध्ये बांधकाम व्यवसाय होता. त्याचे वडील खरबोपती होते. त्याचे वडील इतके श्रीमंत होते की त्यावेळी लादेनच्या वाट्याला 7 अब्ज रुपयांची संपत्ती आली होती.

लादेन सिव्हिल इंजिनिअर

ओसामा बिन लादेन लहानपणापासूनच शिक्षणात हुशार आणि चुणचुणीत होता. जेद्दा येथील किंग अब्दुल अजीज विद्यापीठातून त्याने 1979 मध्ये स्थापत्य अभियंता म्हणून पदवी मिळवली. सिव्हिल इंजिनिअर झाल्यावर त्याने वडिलांच्या व्यवस्यात मदत केली. अफाट श्रीमंतीमुळे त्याला दारुचे व्यसन लागले. तो नाईट क्लबमध्ये जायचा. शिक्षण घेत असतानाच त्याचा धार्मिक कट्टरवाद्यांशी संबंध आला होता. या सदस्यांनी त्याला आपल्याकडे ओढण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यावेळी अमेरिका, सोव्हिएत संघ आणि युरोपियन देशांविरोधात हे कट्टरतावादी काम करत होते.

17 व्या वर्षी केला प्रेम विवाह

वर्ष 1974 मध्ये ओसामा बिन लादेन याने 17 व्या वर्षी पहिले लग्न केले. त्याने नजवा नावाच्या मुलीशी प्रेम विवाह केला होता. ती सिरीया या देशाची होती. दोन्हीकडच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. लादेन याला नजवा कडून अब्दुल्ला, अब्दुल रहमान, साद, ओमर, उस्मान, मुहम्मद, फातिमा, इमान, लादिन बकिर, रुकैय्या आणि नूर ही अपत्य झाली. 9/ 11 हल्ल्यापूर्वीच दोघे विभक्त झाले. नजवा नंतर लादेन याने 1983 मध्ये खादिजासोबत लग्न केले होते. 1995 मध्ये दोघांमध्ये तलाक झाला होता. दोघांना अली, अमेर आणि अलिशा ही मुलं झाली होती.

या मुली पण लग्नाच्या पंक्तीत

1985 मध्ये लादेन याने खैरिया या मुलीशी निकाह केला. ती 2011 मध्ये हा इहलोक सोडून गेली. त्यांना हमजा हा मुलगा झाला. 1987 मध्ये लादेन याने सिहम हिच्याशी विवाह केला. तिच्यापासून त्याला तीन मुलं झाली. 1996 मध्ये त्याने अजून एका महिलेशी लग्न केले होते. तर वर्ष 2000 मध्ये लादेन याने अमल हिच्याशी निकाल केला होता. तिच्यापासून त्याला सैफिया, आसिया, इब्राहिम, जैनब आणि हुसैन ही मुलं झाली होती. तो मारला गेला तेव्हा या दहशतवाद्याच्या बंगल्यात पोर्न व्हिडिओ, सीडीज आणि पुस्तकं सापडली होती.

तालिबानशी केली दोस्ती

लादेन अमेरिकन गु्प्तहेर संघटनांना सारखा चकमा देत होता. त्याला मारण्याच्या अनेक योजना सफशेल फेल ठरल्या होत्या. 2001 पासून अमेरिका त्याचा शोध घेत होता. तो नंतर तालिबानला जाऊन मिळाला. तो अफगाणिस्तानमध्ये आश्रयाला होता. तिथे त्याच्यावर झालेले हल्ले अयशस्वी ठरले होते. तो वाचला होता. त्याने व्हिडिओ शेअर करत त्याची माहिती दिली होती.

ओसामाला शोधून केले ठार

अमेरिकेचा खास मित्र आणि दहशतवाद्यांचा स्वर्ग असलेल्या पाकिस्तानमध्ये तो लपल्याचे अमेरिकेला कळले होते. मग अमेरिकेने पाकिस्तान सरकार, लष्कराची सूत्र हाती घेतली. 2 मे 2011 रोजी अमेरिकेच्या नेव्ही सील्सची एक छोटी तुकडी पाकिस्तानमधील एबटाबादमध्ये दाखल झाली. शहरातील एका किल्लावजा बड्या बंगल्यावर त्यांनी छापा टाकला.

अमेरिका नेव्ही सील्सने हल्ला केला. त्यावेळी अमाल आणि लादेन घरातील वरच्या बेडरूममध्ये होते. तर दोन बायका या खालच्या मजल्यावर झोपलेल्या होत्या. त्याचे तीन मुले होते. नेव्ही सील्सने या हल्ल्याचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. लादेनच्या डोक्यात गोळी घालण्यात आली होती. त्याची तीन मुलं मारल्या गेली. त्याच्या तीनही बायकांना अटक करण्यात आली. तर एका पत्नीसह त्याच्या सात मुलांना इराणमध्ये कैद करण्यात आले. त्याच्या पत्नीच्या टीपमुळेच तो मारल्या गेल्याचे पुढे उघड झाले. लादेन याला समुद्रात दफन करण्यात आले. त्यापूर्वी त्याचा डीएनए वेगळा करण्यात आला.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.