काश्मीरमधील तरुणांना भडकावण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल, थेट तुर्कीतून नवं षडयंत्र होत असल्याचा आरोप

पाकिस्तानच्या (Pakistan) कुरापती सुरुच आहेत. काश्मिरमध्ये (Kashmir) अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत.

काश्मीरमधील तरुणांना भडकावण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल, थेट तुर्कीतून नवं षडयंत्र होत असल्याचा आरोप
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 9:51 PM

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या (Pakistan) कुरापती सुरुच आहेत. काश्मिरमध्ये (Kashmir) अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. आता तर पाकिस्तानने आपल्या या कामात आंतरराष्ट्रीय कुरापतखोर देशांचीही मदत घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय पत्रकार आंद्रियास माऊंटजोरालियास यांनी आपल्या अहवालात म्हटलं आहे की पाकिस्तान तुर्कीच्या (Turkey) मदतीने काश्मीरमधील वातावरण अस्थिर करण्याचं षडयंत्र रचत आहे. असं असलं तरी तुर्कीच्या भारतातील राजदुतांनी हा दावा फेटाळून लावला आहे (Allegations of Turkey planning to sent Syrian mercenaries to Kashmir to spread terror in state).

पत्रकार आंद्रियास माउंटजोरालियास यांनी आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की “पाकिस्तान आणि तुर्की एकत्र येऊन काश्मीरमध्ये भारतविरोधी वातावरण तयार करण्यासाठी षडयंत्र रचत आहे. यानुसार तुर्की सीरियातील तरुणांना काश्मिरमध्ये पाठवण्याचा कट रचत आहे.” ‘Erdogan sends mercenaries to Kashmir’ असं या रिपोर्टचं नाव आहे. यात तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तय्यप एर्दोगन (Recept Tayyip Erdogan) यांचाही समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तुर्कीने काश्मीरबाबतच्या या वृत्ताला फेटाळलं आहे. नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना तुर्कीचे राजदूत अकीर ओजान तोरनुलर यांनी हे वृत्त आधारहीन असल्याचं म्हटलं आहे.

मुस्लिमांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

या अहवालानुसार तुर्कीला दक्षिण आशियातील मुस्लिमांवर आपला प्रभाव वाढवायचा आहे. त्याचाच भाग म्हणून हा कट आखला जात आहे. आतापर्यंत दक्षिण आशियातील मुस्लीम समुहात सौदी अरबचा अधिक प्रभाव आहे. या योजनेत पाकिस्तान देखील तुर्कीसोबत आहे. तुर्की आणि पाकिस्तान मिळून यासाठी प्रयत्न करत आहेत. दोन्ही देश एकमेकांच्या सैन्यामध्ये देखील हस्तक्षेप वाढवत आहेत.

हेही वाचा :

काश्मीरच्या मुद्द्यावर मुस्लीम देशांच्या संघटनेतही पाकिस्तानचा पराभव

पाकिस्तानच्या खेळाडूंकडून कोरोना नियमांचं उल्लंघन, न्यूझीलंडच्या अधिकाऱ्यांचा पारा चढला

कराचीचं नंतर बघू, आधी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा, संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Allegations of Turkey planning to sent Syrian mercenaries to Kashmir to spread terror in state

Non Stop LIVE Update
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.