अमेरिकेकडून समुद्रात 2 आठवडे पाठलाग, रशियन जहाजात निघालं असं काही की उडाली मोठी खळबळ, कारवाई होणार!
अमेरिकेने रशियन तेल टँकर ताब्यात घेतले आहे. या तेल टँकरमध्ये युक्रेनीयन नागरिक असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या नागरिकांवर कारवाई केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

America Captured Russian Oil Ship : अमेरिकेने रशियाचे एक तेल वाहून नेणारे एक मोठे जहाज जप्त केले आहे. या महाकाय जहाजाला ताब्यात घेतल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. कारण हे जहाज रशियाचे असून यात युक्रेनी नागरिक आढळून आहेत. विशेष म्हणजे याच तेलवाहू जहाजामध्ये दोन भारतीयांचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. या जहाजात युक्रेनचे नागरिक असल्याचे समजल्यानंतर आता युक्रेनच्या सरकारने अमेरिकन सरकारशी चर्चा चालू केली आहे. या नागरिकांच्या सुटकेसाठी युक्रेनकडून प्रयत्न केले जात आहेत. या जहाजात दोन रशियन नागरिकही होते. मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही रशियन नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. परंतु आता युक्रेनचे नागरिक मात्र तसेच अडकून बसले आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
युक्रेनच्या दूतावासाकडून चर्चा सुरू
अमेरिकेने जप्त केलेल्या या तेलवाहू जहाजाचे नाव बेला-1 असे आहे. या जहाजात रशियन, युक्रेनीयन तसेच काही भारतीय नागरिक असल्याचे बोलले जात आहे. याबाबत युक्रेनमधील प्रवादा नावाच्या एका पोर्टलने सविस्तर वृत्त दिले आहे. अमेरिकेतील युक्रेनीयन दूतावासाचे अधिकारी अमेरिकेन प्रशासनाच्या संपर्कात आहेत. या प्रकरणातील तथ्य काय आहे, हे समजून घेऊन नेमकी काय कारवाई करायची, हे ठरवले जाईल, असे युक्रेनच्या दूतावासाने सांगितले आहे.
अमेरिकेने काय कारवाई केली होती?
रशियाने केलेल्या या कारवाईबाबत रशियाच्या REN या टिव्ही चॅनेलने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार अमेरिकेने जप्त केलेल्या या जहाजात 20 युक्रेनी नागरिक आहेत. सोबतच 6 जॉर्जिया, 2 रशियन लोक होते. या जहाजात तीन भारतीय क्रू मेंबर्सही आहेत. युक्रेनच्या दूतावासाने मात्र या आकड्यांची पुष्टी केलेली नाही. अमेरिकेने 7 जानेवारी रोजी हे जगाज जप्त केले होते. अमेरिकेने दोन तेल तेलवाहून जहाज जप्त केले होते. यातील एक जहाज हे रशियात नोंदणीकृत आहे. सलग दोन आठवडे पाठलाग करून अमेरिकेने ही तेलवाहू जहाजे जप्त केली होती.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय नियमांचे, प्रतिंबधांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली, असे अमेरिकेकडून सांगण्यात येत आहे. आता ताब्यात घेण्यात आलेल्या नागरिकांवर कारवाई केली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
