ट्रम्प म्हणजे Ch*ya, अमेरिकन तज्ज्ञाची Live चर्चेतच शिवीगाळ; जगात पहिल्यांदाच महासत्तेच्या प्रमुखाचा असा उद्धार झाला असेल
डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलचा रोष वाढल्याचे सध्या चित्र आहे. फक्त भारत आणि इतर देशच नाही तर अमेरिकेतूनही त्यांचा विरोध होताना दिसतोय. डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने धक्कादायक अशी निर्णय घेताना दिसत आहेत. त्यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावल्याने त्यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या 6 महिन्याच्या कार्यकाळाबद्दल चर्चा करताना अमेरिकन तज्ज्ञानी थेट शिवीगाळ केल्याने एकच खळबळ उडालीये. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल काही आपत्तीजनक शब्दांचा वापर करण्यात आला. अमेरिकी तज्ज्ञ कॅरोल क्रिश्टिन पाकिस्तानी मूळ ब्रिटिश पत्रकार मोइद पीरजादा यांच्यासोबत चर्चा करत असताना हा प्रकार घडला. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना थेट Ch***ya म्हटले. कॅरोल क्रिश्टिन अमेरिकन राजनीतिक वैज्ञानिक आणि जॉर्जटाऊन विश्वविद्यालयाच्या वॉल्श स्कूल ऑफ फॉरे सर्विसमध्ये असोशिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.
कॅरोल क्रिश्टिन यांना अमेरिकन रणनीती विशेषतज्ज्ञ मानले जाते. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल असे विधान केल्याने जोरदार चर्चा रंगलीये. फक्त चर्चाच नाही तर त्यांच्या या विधानाचा एक व्हिडीओ हा देखील सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे त्या डोनाल्ड ट्रम्प यांना Ch***ya म्हणताना दिसत आहेत. कॅरोल या मोइद पीरजादा यांच्यासोबत चर्चा करत होत्या.
Christine Fair calls Donald Trump a CHUTIYA in a discussion with British Pakistani Journalist Moeed Pirzada. 😂😂😂 pic.twitter.com/Ay3tq8bh24
— Incognito (@Incognito_qfs) August 25, 2025
त्यांना भारत आणि चीन यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता त्या उत्तर देत असताना त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल थेट Ch***ya म्हटले. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात अधिकारी हे फिल्ड एक्सपर्ट नाहीत. त्यांनी म्हटले की, आपण लक्षात घेतले पाहिजे की, आपली नोकरशाही नेमकी कशी आहे. या नोकरशाहीत तब्बल 25 वर्ष काम केले आहे. हेच कळत नाही की, आपल्या नोकरीतील तज्ज्ञ कुठे गेले.
त्यांनी म्हटले की, माझ्यातील आशावादी व्यक्तीला असा विश्वास वाटेल की नोकरशाही ते हाताळेल..पण माझ्यातील निराशावाद म्हणतो की, आता तर सहा महिने झाली आहेत आणि आम्हाला या Ch***ya सोबत तब्बल चार वर्ष पूर्ण करायची आहेत. कॅरोल क्रिश्टिन यांचे बोलणे ऐकून पत्रकार मोइद पीरजादा देखील हसताना दिसत आहेत. फक्त भारत किंवा इतर देश नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतूनही जोरदार टीका सध्या होताना दिसत आहे.
