AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना भारतापुढे झुकावंच लागणार? अमेरिकेतून मोठी माहिती समोर; एचवनबी व्हिसा…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एचनवबी व्हिसाचे शुल्क वाढवलेले आहे. त्यानंतर आता अमेरिकेतून मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय घडणारं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना भारतापुढे झुकावंच लागणार? अमेरिकेतून मोठी माहिती समोर; एचवनबी व्हिसा...
donald trump
| Updated on: Nov 01, 2025 | 5:11 PM
Share

Donald Trump H1-b Visa : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. अमेरिकेला भारतात आपला व्यापारविस्तार करायचा आहे. म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वेगवेगळ्या मार्गाने भारताची कोंडी करू पाहात आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एचवनबी व्हिसावर तब्बल 88 लाख रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेत जाऊन करिअर घडवू इच्छिणाऱ्या भारतीय तरुणांनाच बसला आहे. असे असतानाच आता अमेरिकेतून मोठी अडपेड समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे अमेरिकेतीलच खासदारांनी एचवनबी व्हिसासंदर्भातील हा नवा निर्णय रद्द करावा, असी मागणी केली जात आहे.

नेमकी काय माहिती समोर आली आहे?

डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयानुसार अमेरिकेत जाऊन नोकरी करण्यासाठी लागणाऱ्या एचवनबी व्हिसासाठी अर्ज करायचे असेल तर त्यासाठी 88 लाख रुपयांचे शूल्क भरावे लागते. या व्हिसाचा सर्वाधिक वापर भारतीय तरुणच करतात. त्यामुळे ट्रम्प यांच्या निर्णयाचा फटका हा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाच बसतो आहे. असे असताना आता हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी अमेरिकेत जोर धरू लागली आहे. अमेरिकेतील खासदारांनीच तशी मागणी केली आहे. एचवनबी व्हिसावर लावण्यात आलेल्या वाढीव शुक्लामुळे तसेच अन्य प्रतिबंधांमुळे अमेरिकेच्या तांत्रिक नेतृत्त्व क्षमतेला मोठे नुकसान होऊ शकते. सोबतच भारतासोबत भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधही बिघडू शकतात, असे मत या खासदारांकडून व्यक्त करण्यात आले आहे. या सर्व भावना अमेरिकेच्या खासदारांनी ट्रम्प यांना एका पत्राद्वारे कळवल्या आहेत.

भारत-अमेरिकेतील संबंधावरही भाष्य

अमेरिकेने एचवनबी व्हिसाच्या शुल्कवाढीचा निर्णय 19 सप्टेंबर रोजी घेतला होता. त्यानंतर आता अमेरिकन खासदार अमी बेरा, सालूद कार्बाजल, ज्युली जॉन्सन यांनी ट्रम्प यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी एचवनबी व्हिसाबाबतच्या धोरणावर चिंता व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधावर नकारात्मक प्रभाव पडत असून पूनर्विचार करावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

ट्रम्प आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करणार का?

सोबतच, एचवनबी व्हिसा धोरण हे अमेरिकेच्या विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित या क्षेत्रातील स्पर्धेचा आधारस्तंभ आहे, असेही मत या खासदारांनी व्यक्त केले आहे. या निर्णयामुळे अमेरिकेला एआय क्षेत्रातही मोठा फटका बसू शकतो, अशा भावना या पत्रात व्यक्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ट्रम्प भविष्यात एचवनबी व्हिसाबाबच्या धोरणात बदल करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.