Iran Israel Update : युद्धाची स्थिती असताना भारताच्या तीन शक्तीशाली युद्धनौका इराणमध्ये पोहोचल्या, पण का?

Iran Israel Update : INS तीर, INS शार्दुल आणि ICGS वीरा या युद्धनौका फारसच्या खाडीत पोहोचल्या आहेत. इराणवर कुठल्याही क्षणी मोठा हल्ला होऊ शकतो. कारण नुकताच इराणने इस्रायलवर मिसाइल हल्ला केला. इराणला याची किंमत चुकवावी लागेल असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे.

Iran Israel Update : युद्धाची स्थिती असताना भारताच्या तीन शक्तीशाली युद्धनौका इराणमध्ये पोहोचल्या, पण का?
Navy
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 3:05 PM

इराणने इस्रायलवर केलेला मिसाइल हल्ला, इस्रायल-हिज्बुल्लाहमध्ये सुरु असलेलं युद्ध, मिडल ईस्टमध्ये सध्या प्रचंड तणाव आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाच्या युद्धनौकांचा ताफा इराणमध्ये पोहोचलाय. इस्रायल-हिज्बुल्लाह युद्धादरम्यान भारतीय युद्धनौका इराणमध्ये पोहोचण्याचे बरेच अर्थ काढले जात आहेत. इस्रायल-हिज्बुल्लाह संघर्षाने टोक गाठलय. त्याचवेळी भारतीय नौदलाची तैनाती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. इराणने आता इस्रायलवर मिसाइल हल्ला सुद्धा केला आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल युद्धाची स्थिती असताना भारतीय नौदलाचा ताफा इराणमध्ये का गेलाय? इस्रायलकडून इराणवर कुठल्याही क्षणी हल्ला होण्याची शक्यता आहे.

भारतीय नौदलाचा ताफा फायरच्या खाडीत इराणी नौदलासोबत संयुक्त युद्ध अभ्यासासाठी गेला आहे. इराणच दक्षिणेकडील बंदर अब्बास येथे हा ताफा आहे. इराणमध्ये असलेल्या भारतीय नौदलाच्या या ताफ्याच नाव शांती आणि मैत्री आहे. याची कमान कॅप्टन अंशुल किशोर यांच्याकडे आहे. भारतीय नौदलाच्या ताफ्यात तीन विध्वंसक युद्धनौका आहेत.

भारतीय युद्धनौका तिथे काय करणार?

INS तीर, INS शार्दुल आणि ICGS वीरा या युद्धनौका फारसच्या खाडीत लॉन्ग डिस्टेंस ट्रेनिंग आणि ड्रिल्ससाठी इराणच्या बंदरात आहेत. समन्वय आणि समुद्र सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने उचलेलं हे पाऊल मानलं जातय. भारतीय आणि इराणी नौदल एकत्र सराव करतील. व्यावसायिक आदान-प्रदान, क्रॉस ट्रेनिंग विजिट, स्पोर्ट एक्टिविटी आणि मेरीटाइम सिक्योरिटी यावर विशेष लक्ष दिलं जाईल. याआधी इराणी ट्रेनिंग फ्लीटमधील जहाज बुशहर आणि टोनब ट्रेनिंगसाठी 24 मार्चला मुंबईत आले होते. इराणी नौदलाच जहाज डेनाने फेब्रुवारी महिन्यात मल्टीलॅटरल नेवल एक्सरसाइज ‘मिलन 24’ मध्ये भाग घेतला होता.

नेतन्याहू इराणला उद्देशून काय म्हणाले?

इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सोमवारी इराणी शासकांवर कठोर टीका केली. इराणी जनतेला उद्देशून ते काही गोष्टी बोलले. “इराणचे शासक तिथल्या जनतेचा आवाज दडपून टाकत आहेत. जो पैसा इराणच्या विकासासाठी वापरला पाहिजे तो शस्त्र आणि परदेशी युद्धांमध्ये वाया घालवत आहेत” असं नेतन्याहू म्हणाले.

'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....