AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर वाचवण्याची धडपड! टॅरिफमुळे Apple ने भारतातून 5 विमाने अमेरिकेला पाठवली

टॅरिफची डोकेदुखी वाढली असून कर कसा वाचवता येईल, यासाठी कंपन्या प्रयत्न करत आहेत. अ‍ॅपलने तीन दिवसांत भारतातून आयफोन आणि इतर उत्पादनांनी भरलेली पाच विमाने अमेरिकेला पाठवली आहे. अमेरिकेत 5 एप्रिलपासून लागू झालेला 10 टक्के नवीन 'रेसिप्रोकल टॅरिफ' टाळण्यासाठी हे आपत्कालीन पाऊल उचलण्यात आले.

कर वाचवण्याची धडपड! टॅरिफमुळे Apple ने भारतातून 5 विमाने अमेरिकेला पाठवली
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Apr 08, 2025 | 3:33 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रेसिप्रोकल टॅरिफमुळे कंपन्यांची डोकेदुखी वाढली आहे. भरमसाठ कर टाळण्यासाठी आता वेगवेगळ्या युक्ती कंपन्यांकडून लढवल्या जात आहे. अशीच एक माहिती समोर आली आहे. अ‍ॅपल कंपनीने देखील कर वाचवण्यासाठी एक युक्ती केली आहे. आता ही युक्ती नेमकी काय आहे, याविषयी पुढे विस्ताराने जाणून घेऊया.

अ‍ॅपलने मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अवघ्या तीन दिवसांत भारतातून आयफोन आणि इतर उत्पादनांनी भरलेली पाच विमाने अमेरिकेला पाठवली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे. अमेरिकेत 5 एप्रिलपासून लागू झालेला 10 टक्के नवीन ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ टाळण्यासाठी हे आपत्कालीन पाऊल उचलण्यात आले. मात्र, अ‍ॅपलने अद्याप भारतात किंवा अन्य कोणत्याही बाजारपेठेत आपल्या उत्पादनांच्या किंमती वाढवण्याची कोणतीही योजना आखलेली नाही.

कर टाळण्याचे धोरण

टॅरिफचा प्रभाव कमी करण्यासाठी अ‍ॅपलने भारत आणि चीनमधील मॅन्युफॅक्चरिंग सेंटरमधून मोठ्या प्रमाणात माल अमेरिकेत पाठवण्यास सुरुवात केली. हा असा काळ आहे जेव्हा शिपिंग सहसा कमी असते, परंतु कर वाढला तर त्याचा किंमतींवर परिणाम होणार नाही याची तयारी अ‍ॅपलने आधीच सुरू केली होती.

साठा जमा केल्याने कशी मदत होईल?

रिपोर्टनुसार, अ‍ॅपलच्या या पावलामुळे सध्या किंमती स्थिर राहण्यास मदत होईल. वाढीव करांचा परिणाम टाळण्यासाठी अ‍ॅपल कंपनीने अमेरिकेतील आपल्या गोदामात काही महिन्यांचा साठा पाठवला आहे. पण ही परिस्थिती दीर्घकाळ कायम राहिल्यास अ‍ॅपलला भारतासारख्या जागतिक बाजारात किंमती वाढवाव्या लागू शकतात. विविध देशांतील पुरवठा साखळीवर कर रचनेचा कसा परिणाम होईल, याचे विश्लेषण कंपनी सध्या करीत आहे.

भारत बनला अ‍ॅपलचा विश्वासार्ह उत्पादन पर्याय

ट्रम्प प्रशासनाने 9 एप्रिलपासून 26 टक्के परस्पर शुल्क जाहीर केले आहे, ज्यामुळे अ‍ॅपलला आपली उत्पादन रणनीती बदलावी लागेल. भारत अ‍ॅपलसाठी सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय म्हणून उदयास येत आहे. चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर अमेरिकेत 54 टक्क्यांपर्यंत कर आकारला जात आहे, तर भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर हा कर केवळ 26 टक्के आहे. 28 टक्क्यांचा हा फरक अ‍ॅपलला भारतात उत्पादन वाढवण्यासाठी आकर्षित करत आहे.

अ‍ॅपल आधीच भारतात आयफोन आणि एअरपॉड्सचे उत्पादन करत आहे आणि अमेरिकेला सुमारे 9 अब्ज डॉलर्सच्या स्मार्टफोन निर्यातीत त्याचा मोठा वाटा आहे. जर अमेरिकेने इतर देशांसोबत शुल्क निश्चित केले तर अ‍ॅपलच्या उत्पादन धोरणात आणखी बदल होऊ शकतात.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.