अमेरिकेनं हात बांधले अन् थेट…, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींचा अटकेनंतरचा पहिला फोटो समोर, जगभरात खळबळ
अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला केला आहे. अवघ्या एका तासातच अमेरिकेनं हे युद्ध संपवलं, व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक करण्यात आली आहे, अटकेनंतरचा त्यांचा पहिला फोटो आता समोर आला आहे.

अमेरिकेकडून अखेर व्हेनेझुएलावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेनं व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगासमोर उघडपणे या युद्धाचं समर्थन केलं आहे. अमेरिकेनं व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतीला एखाद्या कैद्याला अटक करावं असं अटक केलं आहे. त्यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. याचदरम्यान आता व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांचा अटकेनंतरचा पहिला फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये अमेरिकेच्या सैन्याने मादुरो यांना अटक केली असून, ते त्यांना घेऊन जाताना दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, मात्र अद्याप अमेरिकेच्या प्रशासनाकडून या फोटोला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये.
काय आहे फोटोमध्ये?
अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला केला आहे, या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या सैन्यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक केली आहे. त्यांच्या अटकेचा एक फोटो आता समोर आला आहे. स्मिता प्रकाश यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर हा फोटो री- ट्विट केला आहे. या फोटोमध्ये मादुरो यांनी काळ्या रंगाचं जॅकेट घातलं आहे. त्यांच्या आस-पास सर्वत्र अमेरिकेचे सैनिक आहेत. त्यांनी मादुरो यांना अटक केलं आहे. मादुरो यांचे हात मागच्या बाजूने बांधण्यात आले आहेत. त्यांना हेलिकॉप्टरमधून खाली उतरवण्यात आलं, त्यांना सैनिक घेऊन जात आहेत, दरम्यान मादुरो यांना व्हेनेझुएलामधून अटक करून अमेरिकेत आणल्यानंतरचा हा फोटो आहे, असं बोललं जात आहे. मात्र अद्याप या फोटोला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये.
Primera foto de Maduro capturado por Estados Unidos. pic.twitter.com/lNTrS5WqQB
— Gustavo Cardenas (@gustav0cardenas) January 3, 2026
अमेरिका आणि व्हेनेझुएलामधील संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, यामागे व्हेनेझुएलामधून होणारी ड्रग्स तस्करी हे जरी कारण सांगण्यात येत असलं तरी त्यामागे आणखी इतरही अनेक कारणं आहेत. अखेर अमेरिकेनं आज व्हेनेझुएलावर हल्ला केला, अवघ्या तासाभरातच अमेरिकेनं हे युद्ध संपवलं देखील व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेचा पहिला फोटो आता समोर आला आहे.
