AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asim Munir : असीम मुनीर चवताळला, दिले 7 दिवसांचे अल्टिमेटम, न ऐकल्यास…घेतला मोठा निर्णय!

अफगाणिस्तानने केलेल्या हल्ल्यामुळे आता पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर चांगलाच चवताळला आहे. त्याने आता थेट सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

Asim Munir : असीम मुनीर चवताळला, दिले 7 दिवसांचे अल्टिमेटम, न ऐकल्यास...घेतला मोठा निर्णय!
asim munir
| Updated on: Oct 14, 2025 | 7:29 PM
Share

Asim Munir : सध्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री भारताच्या दौऱ्यावर असताना या दोन्ही देशांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला. पाकिस्तानने अफगाणिस्तानवरच्या काही शहरांवर हल्ले केल्यानंतर अफगाणी सैन्यानेही पाकिस्तानचे जवळपास 58 सैनिक मारल्याचे म्हटले जात आहे. याच कारणामुळे आता पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर याची झोपच उडाली आहे. त्याने आपल्याच अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले असून 7 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

नेमका काय आदेश दिला?

मिळालेल्या माहितीनुसार अफगाणी सैन्याच्या हल्ल्यात 58 सैनिक मारले गेल्यानंतर पाकिस्तानी लष्करात सध्या अस्वस्थता आहे. या लष्कराचा प्रमुख असीम मुनीर याने तर हे आमच्या सैन्याचे अपयश असल्याचे ग्रहित धरले आहे. घडलेल्या प्रकारामुळे मुनीर चांगलाच नाराज आहे. त्यामुळेच त्याने आपल्या लष्करातील प्रमुख अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावल असून आपले सैनिक मारले जाणे हे आपल्या गुप्त विभागाचे अपयश आहे, अशी खंत व्यक्त केली आहे. तसेच डूरँड लाईवर अफगाणिस्तानने केलेल्या हल्ल्यांविषयीही काही प्रश्न विचारले. मुनीर याने घडलेल्या या सर्वच प्रकाराचे निट स्पष्टीकरण मागितले आहे.

मुनीरने अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले

तालिबानने आपल्यावर केलेला हा हल्ला म्हणजे आपल्या गुप्तचर विभागाचे अपयश आहे. सोबतच आपल्या रणनीतीमध्येही कमतरता होती, असे म्हणत मुनीरने आपल्या अधिकाऱ्यांना खडसावले आहे. आपले सैनिक का मारले गाले? आपण कुठे कमी पडलो? याचा मला विस्तृत रिपोर्ट हवा आहे, असा आदेशच मुनीरने दिला आहे.

नेमके काय घडले होते?

पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानातील तालिबानने पाकिस्तानच्या ठिकाणांवर हल्ले केले होते. यामध्ये अंगूर अड्डा, बजौर, कुर्रम, दीर, चित्रल, खैबर पख्तूनख्वामधील वजीरिस्तान, बहराम, बलुचिस्तान या सात भागांचा समावेश होता. यात 58 पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता मुनीर याने मागवलेल्या रिपोर्टमध्ये नेमके काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....