AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

bab el mandeb strait : स्ट्रेट ऑफ हॉर्मुजनंतर अजून एक जलमार्ग अडचणीत, जागतिक व्यापारासाठी संकट

bab el mandeb strait : मिडिल ईस्टमधील तणाव आणि हल्ल्याच्या शक्यतेमुळे सौदी अरेबिया दररोज लाखो बॅरल कच्चं तेल जमिनीच्या पाइपलाइन मार्गे पाठवत आहे. फारस खाडीला ही पाइपलाइन जाऊन मिळते. हे कच्चं तेल नंतर बाब-अल-मंडेब स्ट्रेट मार्गे पाठवलं जातं.

bab el mandeb strait : स्ट्रेट ऑफ हॉर्मुजनंतर अजून एक जलमार्ग अडचणीत, जागतिक व्यापारासाठी संकट
bab el mandeb strait
| Updated on: Jul 26, 2026 | 1:18 PM
Share

इराण समर्थित हुती बंडखोरांकडून धोका असतानाही अनेक जहाजांची बाबा अल-मंडेब स्ट्रेटमधून जल वाहतूक सुरु आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या शिपिंग डेटा विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. समुद्रातून जलवाहतूक करताना सुरक्षेची पूर्ण खात्री नसल्याने अनेक जहाजांना आपला मार्ग बदलावा लागतोय. प्रवास पूर्ण करण्याआधीच यू-टर्न घ्यावा लागत आहे असं रिपोर्टमधून समोर आलं आहे. मागच्या आठवड्यात हूती बंडखोरांनी कमीत कमी तीन तेल टँकर्सना टार्गेट केलं होतं. यात सर्वात मोठा हल्ला शुक्रवारी झाला होता. लाल समुद्रात जलवाहतुकीत वारंवार अडथळे आले, तर तो जागतिक व्यापारासाठी मोठा झटका ठरेल. मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षाचा परिणाम लाल समुद्रात दिसून येतोय. अमेरिका आणि इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा हा पाचवा महिना आहे. यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील जल वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. हा एक महत्वाचा समुद्री मार्ग आहे. जवळपास 20 टक्के जागतिक तेल वाहतूक या मार्गावरुन होते.

मिडिल ईस्टमधील तणाव आणि हल्ल्याच्या शक्यतेमुळे सौदी अरेबिया दररोज लाखो बॅरल कच्चं तेल जमिनीच्या पाइपलाइन मार्गे पाठवत आहे. फारस खाडीला ही पाइपलाइन जाऊन मिळते. हे कच्चं तेल नंतर बाब-अल-मंडेब स्ट्रेट मार्गे पाठवलं जातं. या मार्गावरील एका अरुंद पण महत्वाच्या पट्ट्यावर हुती बंडखोरांचं नियंत्रण आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुज मध्ये धोका असल्याने बाब-अल-मंडेब स्ट्रेट मार्गे जहाजांची जलवाहतूक सुरु असते.

43 जहाजांनी बाब अल-मंडेब पार केलं

समुद्र जलवाहतुकीची ट्रॅकिंग करणारी कंपनी Kpler च्या ट्रॅकिंग डेटानुसार,जवळपास 10 पेक्षा जास्त जहाजं मागे फिरली किंवा या स्ट्रेट मधून जाणं टाळलं. Kplerच्या डेटानुसार गुरुवारी 43 जहाजांनी बाब अल-मंडेब पार केलं. बुधवारी 35 जहाजं या मार्गावरुन गेली होती. नुकताच हौती बंडखोरांनी सौदीच्या तेल टँकरवर हल्ला केला. शुक्रवारी लाल सागरात सौदी संबंधी एका जहाजाला टार्गेट करण्यात आलं. यात किरकोळ नुकसान झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. पण जहाजाने पुढे मार्गक्रमण सुरुच ठेवलं.

Follow Us
प्रल्हाद जोशी हे शिक्षणमंत्री झाल्यानंतरची सर्वात मोठी अपडेट, Video...
प्रल्हाद जोशी केंद्रीय शिक्षणमंत्री झाल्यानंतरची सर्वात मोठी अपडेट, व्हिडीओमध्ये नेमकं काय?
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या घरी, राज्याच्या राजकारणात मोठं घडतंय?
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत ठाकरे
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत उद्धव ठाकरे हे काय म्हणाले?
ही जनतेच्या आंदोलनाची ताकद, अखेर सरकारला नमवलं; राज ठाकरेंचं भाषण...
ही जनतेच्या आंदोलनाची ताकद, अखेर सरकारला नमवलं; राज ठाकरेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
एकाहुन एक पोस्टर अन् मिम्स, ठाकरेंच्या विजय सभेसाठी समर्थकांची गर्दी
Thackeray Sabha Video | एकाहुन एक पोस्टर अन् मिम्स, ठाकरेंच्या विजय सभेसाठी समर्थकांची मोठी गर्दी
एकच जल्लोष! मनसेतील बड्या नेत्यांचा लोकलने प्रवास, ट्रेनमधील Video...
एकच जल्लोष! मनसेतील बड्या नेत्यांचा लोकलने प्रवास, ट्रेनमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
मुंबईत मोठ्या घडामोडी! ठाकरे बंधूंच्या विजय सभेपूर्वीच...
Mumbai | मुंबईत मोठ्या घडामोडी! ठाकरे बंधूंच्या विजय सभेपूर्वीच...
प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे बंधूंची जल्लोष सभा; सगळीकडे लगबग,पहा
Thackeray Brothers Sabha | प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे बंधूंची जल्लोष सभा; सगळीकडे लगबग, पहा व्हिडीओ
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!