अजीत डोभाल, मेजर गौरव आर्या, कुलभूषण जाधव… बलूचिस्तान ट्रेन हायजॅकवरुन पाकिस्तानचे बेछूट आरोप
Jaffar Express train attack: पाकिस्तानी लष्करातील मीडिया विंगने कुलभूषण जाधव यांनी पाकिस्तानमधील कारागृहात दिलेला कबुली जबाब, मेजर गौरव आर्या यांचे ट्वीट आणि अजीत डोभाल यांचे जुने व्हिडिओ समोर आणले आहे.

Balochistan Train Attack: बलूचिस्तान ट्रेन हायजॅक प्रकरणात पाकिस्तानची पूर्ण नाचक्की झाली आहे. बलूचिस्तान आर्मीने पाकिस्तानी लष्करातील 214 सैनिकांना मारल्याचा दावा केला आहे. या ट्रेनमध्ये 450 प्रवाशी होते. परंतु बलूच आर्मीने महिला, मुले आणि वृद्धांना सोडून दिले होते. पाकिस्तानचे हे ऑपरेशन अयशस्वी झाल्यामुळे पाकिस्तान आता भारत आणि अफगाणिस्तानवर बेछूट आरोप करत आहे. या घटनेच्या मागील मास्टरमाइंड अफगाणिस्तानमध्ये बसले होते. बलूच आर्मीचे मुले सतत अफगाणिस्तानमधील हँडलरचा संपर्कात होते, असा आरोप पाकिस्तानकडून करण्यात येत आहे.
अफगाणिस्तानने पाकिस्तानचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. अफगाण तालिबानने पाकिस्तानचे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. बलुच लिबरेशन आर्मीचा एकही सैनिक अफगाणिस्तानच्या भूमीवर नसल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी माध्यमे आरोप करत आहे की, बाहेरच्या मदतीशिवाय बलूच आर्मी इतकी मोठी घटना करु शकत नाही. ही बाहेरची मदत भारत करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
काय आहे पाकिस्तानचे आरोप
पाकिस्तानी पत्रकारांनी आरोप केले आहे की, बलुचिस्तानमधील दहशतवादी हल्ल्याची बातमी भारतीय प्रसारमाध्यमांनी ज्या प्रकारे दिली, त्यावरून वाटते की भारतीय प्रसारमाध्यमांना आधीच याबाबत माहिती होती. या घटनेबद्दल भारतीय माध्यमांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. पुरावे म्हणून पाकिस्तानी लष्करातील मीडिया विंगने कुलभूषण जाधव यांनी पाकिस्तानमधील कारागृहात दिलेला कबुली जबाब, मेजर गौरव आर्या यांचे ट्वीट आणि अजीत डोभाल यांचे जुने व्हिडिओ समोर आणले आहे. या माध्यमातून बलुचिस्तानमध्ये भारत सक्रीय असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे.




पाकिस्तानी लष्कराने मेजर गौरव आर्य यांचे एक ट्विट दाखवले आहे. त्यात मेजर गौरव आर्य यांनी म्हटले होते की, ‘बलुचिस्तानमधील शांततेचा मार्ग काश्मीरमधील शांततेतून जातो.’ अजित डोभाल यांचे असेच जुने व्हिडिओ दाखवले जात आहे.
बलुचिस्तानमध्ये ऑपरेशन ऑलआऊट
पाकिस्तानी लष्कर आता बलुचिस्तानमध्ये ऑलआऊट ऑपरेशन राबणार असल्याचे पाकिस्तानी पत्रकार कामरान युसूफ यांनी म्हटले आहे. त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानी लष्कर राष्ट्रीय कृती प्रोग्रॉम (NAP) भाग-2 ची घोषणा करू शकते. त्यामध्ये बलुचिस्तानमध्ये मोठी लष्करी कारवाई केली जाऊ शकते. 2014 मध्ये पेशावर सैनिक स्कूलवर झालेल्या हल्ल्यानंतर पहिली राष्ट्रीय कृती प्रोग्रॉम राबण्यात आला होता.