AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने ज्याच्यावर ठेवला विश्वास तोच मित्र निघाला खरा शत्रू, थेट मोठी धमकी, सप्टेंबरपर्यंत..

बांगलादेश आणि भारत गंगा जल करार मुद्द्यावर समोरासमोर आलेत. सप्टेंबर महिन्यात हा करार संपत आहे. यादरम्यान घडामोडींना प्रचंड वेग आला. भारतानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा करार होण्यापूर्वी वाद वाढण्याची शक्यता आहे.

भारताने ज्याच्यावर ठेवला विश्वास तोच मित्र निघाला खरा शत्रू, थेट मोठी धमकी, सप्टेंबरपर्यंत..
Bangladesh Ganges River Water Treaty
| Updated on: May 18, 2026 | 10:02 AM
Share

बांगलादेश आणि भारताचे संबंध चांगले आहेत. मात्र, गंगा जल करार यामुळे दोन्ही देश एकमेकांच्या पुढे उभी आहेत. यंदा सप्टेंबर महिन्यात गंगा जल करार संपत आहे. या कराराच्या माध्यमातून गंगा नदीचे पाणी वाटप ठरते. 1996 ला भारत आणि बांगलादेश यांच्यात हा करार झाला. जो संपत आहे. दोन्ही देशांनी पुन्हा नवा करार करण्याकरिता तयारी सुरू केली. यादरम्यानच भारत कराराकरिता नवा फॉर्मुलाच्या तयारीत आहे. ज्याला बांगलादेशाने विरोध करत थेट तर्कहीन म्हटले. बांगलादेशातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारताकडून जो मुद्दा उचलण्याचा प्रयत्न केला जात आहे, ज्यामुळे करार होण्यास विलंब होऊ शकतो किंवा करारच संकटात येऊ शकतो. फखरूल इस्लाम आलमगीर यांनी एका कार्यकर्मात यावर भाष्य देखील केले.

फखरूल इस्लाम आलमगीर यांनी म्हटले की, आम्ही भारताला स्पष्टपणे सांगू इच्छितो की, बांगलादेशातील लोकांच्या अपेक्षा आणि त्यांच्या गरजा यानुसार चर्चा व्हायला हवी. नवीन गंगा जल करार तात्काळ लागू करायला हवा. बांगलादेश संसाधन मंत्री शाहिद उद्दिन चाैधरी एनी यांनी बीबीसी बांगलाला बोलताना म्हटले की, सरकारकडून या प्रकरणात एक समिती तयार करण्यात आली.

आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे की, दोन्ही देशातील तज्ज्ञ यावर चर्चा करतील आणि मार्ग काढतील. या गंगा जल करारच्या माध्यमातून दोन्ही देशातील मतभेद थेटपणे पुढे येत आहेत. भारताला जुना गंगा जल करारचा फॉर्मुला मान्य नाही. भारताकडे नवा प्लॅन आहे. यादरम्यानच बांगलादेशकडून सीमेजवळ एक धरण बांधले जात आहे, तसे त्यांची प्लॅनिंग आहे. मात्र, याकरिता बांगलादेशने थेट चीनची मदत मागितली.

हीच गोष्ट भारताला अजिबात आवडली नाही. कारण चीनचा त्या क्षेत्रात प्रवेश म्हणजे भारताच्या सुरक्षेला धक्का मानला जातो. धक्कादायक म्हणजे बांगलादेशाला चीनने मदत करण्याचे वचन दिले. ज्यामुळे आता गंगा जल करारात भारत बांगलादेशाचे काहीही ऐकणार नाही, हे तर स्पष्टच आहे. भारत आपल्या मुद्द्यावर ठाम राहणार असल्याची सध्या स्थिती बघायला मिळते. मात्र, बांगलादेशाला कोणत्याही परिस्थितीमध्ये यातून लवकराच लवकर मार्ग काढायचा आहे.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन