बार आणि पबला मिळणार पूजा स्थळाचा दर्जा?, या देशात होतीये अजब मागणी

जगभरात ख्रिसमस आणि नवीन वर्षाची तयारी जोरदारपणे सुरु आहे. अशातच यु.के.मधल्या दोन बार आणि पबच्या मालकाने सरकारला खास आवाहन केलंय.

बार आणि पबला मिळणार पूजा स्थळाचा दर्जा?, या देशात होतीये अजब मागणी
Follow us
| Updated on: Dec 06, 2020 | 5:25 PM

लंडन : जगभरात ख्रिसमस आणि नवीन वर्षाची जोरदारपणे तयारी सुरु आहे. अशातच यु.के.मधल्या दोन बार आणि पबच्या मालकाने सरकारला खास आवाहन केलंय. त्याने आपल्या बार आणि पबला पूजास्थळाचा दर्जा द्या, असं आवाहन करत त्यासाठी सरकारकडे अप्लाय केलं आहे. (bar And pubs in Uk Apply to register as place of Worship)

कोरोना संसर्गाच्या फैलावाने सगळं जग अडचणीत सापडलंय. त्यात आता अनेक देशांत कोरोनाची दुसरी-तिसरी लाट आली आहे. युकेमध्ये कोरोनामुळे सध्या बऱ्याच गोष्टींवर सरकारने निर्बंध आणले आहेत. यामध्ये टियर तीनमध्ये येणाऱ्या बार आणि पबमधून लोक फक्त ड्रिंक्स घेऊन जाऊ शकतात. याउलट सरकारने धार्मिक स्थळं पूर्ण वेळेसाठी खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशात New Baron of Hinckley आणि Mezal Cocktail Bar या बार आणि पबच्या मालकाने आपल्या दुकानांना पूजा स्थळाचा दर्जा देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

“कोरोना काळापासून हॉस्पिटॅलिटी क्षेत्राची वाट लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊनमुळे आमचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे जे भरुन येणारं नाही. बार आणि पब आणखीही बंद ठेवायचं म्हटलं तर आमचं जगणं अवघड होईल. सरकारने नियम बनवताना आमचा विचार करायला हवा”, असं त्या बार आणि पबच्या मालकाने म्हटलं आहे.

कोरोना व्हायरसचा धोका आणखी टळलेला नाही. आणखीही बऱ्याच देशांत कोरोनाचे पेशंट मिळत आहे. भारतात महाराष्ट्र, दिल्ली तसंच कर्नाटकात कोरोनाचे अधिक पेशंट आहेत.

संबंधित बातम्या

नाईट लाईफ म्हणजे पब आणि बार नव्हे, आदित्य ठाकरेंनी ‘मुंबई 24 तास’ संकल्पना सविस्तर सांगितली!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.