इस्रायलमध्ये 27 डिसेंबरपासून कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात, दिवसाला 60 हजार नागरिकांचे लसीकरण

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घोषणा केली आहे की, "इस्रायलमध्ये 27 डिसेंबरपासून कोरोनापासून बचावासाठी नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे".

इस्रायलमध्ये 27 डिसेंबरपासून कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात, दिवसाला 60 हजार नागरिकांचे लसीकरण
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 3:43 PM

जेरुसलेम : जगभरात आतापर्यंत 6 कोटी 80 लाखांहून अधिक लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. जगातील सुमारे 15 लाख लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. भारतातही 1 लाख 40 हजाराहूंन अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गाच्या एक वर्षानंतर कोरोनावरील लसीच्या वापराला ब्रिटन, कॅनडासारख्या अनेक देशांनी मंजुरी दिली आहे. ब्रिटनमध्ये तर लसीकरणाला सुरुवातदेखील झाली आहे. या देशांच्या यादीत आता इस्रायलचाही समावेश होणार आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी घोषणा केली आहे की, “इस्रायलमध्ये 27 डिसेंबरपासून कोरोनापासून बचावासाठी नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे”. (Benjamin Netanyahu says vaccination is going to start in Israel from 27th december 2020)

तत्पूर्वी, नेतन्याहून यांनी फायझर कंपनीची लस इस्रायलमध्ये दाखल झाली असल्याची माहिती दिली होती. तसेच ही सेलिब्रेशन करण्याची वेळ असल्याचे नेतन्याहू म्हणाले होते. नेतन्याहू म्हणाले होते की, “माझा या लसीवर पूर्ण विश्वास असून येत्या काळात या लसीला मंजुरी मिळेल असे माला वाटते”.

दिवसाला 60 हजार लोकांचे लसीकरण होणार

नेतन्याहू म्हणाले की, “मला आपल्या देशात लसीकरण करुन घेणारी पहिली व्यक्ती व्हायचं आहे. जेणेकरुन लोकांसमोर एक उदाहरण तयार होईल, तसेच लोकांचा या लसीवरील विश्वास वाढेल. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, 27 डिसेंबरपासून लसीकरणाला सुरुवात होईल. त्यानंतर दरदिवशी तब्बल 60 हजार लोकांना लस दिली जाईल. आपल्या देशाची लोकसंख्या 90 लाख इतकी आहे. त्यामुळे काही महिन्यांमध्ये आपल्याकडे लसीकरण पूर्ण होईल”.

लसीकरणानंतर विशेष कार्ड दिलं जाणार

नेतन्याहू म्हणाले की, “आपण आता या विषाणूला संपवण्याच्या तयारीत आहोत. इस्रायलमध्ये नागरिकांना ज्या दिवशी लस दिली जाईल, त्याचवेळी त्यांना एक विशेष कार्ड दिले जाईल किंवा फोनमध्ये एक अॅप इन्स्टॉल करुन दिलं जाईल. ज्याद्वारे त्यांना या लसीकरणाबाबतची संपूर्ण माहिती दिली जाईलच, तसेच या कार्डमुळे ते नागरिक देशभरात कुठेही कोणत्याही अडचणीशिवाय फिरु शकतील. नागरिकांनी लसीकरण करुन घ्यायला हवं, तसेच आपली अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यासाठी इतरांनांही लसीकरणासाठी प्रोत्साहन द्यायला हवे”.

ब्रिटनपाठोपाठ कॅनडाकडूनही फायझर-बायोएनटेकच्या कोरोना लसीला मंजुरी

कॅनडाच्या आरोग्य मंत्रालयानं फायझर-बायोएनटेकच्या (Pfizer-BioNtech) कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. यापूर्वी ब्रिटन फायझरच्या कोरोना लसीला मंजुरी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला होता. इतकच नाही तर ब्रिटनमध्ये मंगळवारपासून लसीकरणालाही (vaccination) सुरुवात करण्यात आली आहे. कॅनडाच्या कोरोना विरोधातील लढाईत ही लस म्हणजे मोठं यश मानलं जात आहे. त्याचबरोबर सर्व शक्यता पडताळूनच या लसीला मंजुरी दिल्याचं कॅनडाच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.(Approval of Pfizer-Bioentech’s Corona vaccine in Canada)

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅनडामध्ये या महिनाभरात लसीचे 2 लाख 49 हजार डोस मिळणार आहे. कॅनडा सरकारने लसीच्या एकूण 2 कोटी डोसची खरेदी केली आहे. जी कॅनडातील एक कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी उपयुक्त ठरणार आहे.

भारत सरकारचा मेगा प्लॅन

भारतात कोरोना लसीचा मेगा प्लॅन आखण्यात आला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारने लसीकरण्यासाठी आखून दिलेल्या समितीने आधी लस कुणाला द्यायची याबाबत काही सूचना दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 1 कोटी आरोग्य कर्मचारी, 2 कोटी पोलीस, आर्मी आणि सुरक्षा यंत्रणांमधील कर्मचाऱ्यांना लस देण्याचं सूचवण्यात आलं आहे. तर 27 कोटी 50 वर्षावरील आणि 50 वर्षाखालील नागरिकांना लस देण्यास सूचवण्यात आलं आहे. लसीकरण्यासाठी प्रत्येक राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर टास्क फोर्स असणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली.

संबंधित बातम्या:

67 देशांचे राजदूत भारत दौऱ्यावर, भारत बायोटेकच्या कोरोना लसीचा आढावा घेणार

कोरोना लशीच्या नोंदणीसाठी ‘हे’ अ‍ॅप लोकांना मदत करणार, आरोग्य मंत्रालयाची माहिती

केंद्र सरकारचा कोरोना लसीचा मेगा प्लॅन तयार, पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस?

अनेक देशांत मंजूरी मिळालेल्या Pfizer च्या कोरोनावरील लसीची काय आहे किंमत आणि वैशिष्ट्ये?

‘लस टोचल्यानंतर दोन महिने दारूला हात लावू नका’, रशिया सरकारचा नागरिकांना इशारा

(Benjamin Netanyahu says vaccination is going to start in Israel from 27th december 2020)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.