AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jafar Express Blast : पाकिस्तान पुन्हा हादरलं, जाफर एक्स्प्रेसमध्ये मोठा स्फोट

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामधील मस्तुंग जिल्ह्यात रविवारी पेशावरकडे निघालेल्या जाफर एक्स्प्रेसमध्ये आयईडीचा IED मोठा स्फोट झाला आहे.

Jafar Express Blast : पाकिस्तान पुन्हा हादरलं, जाफर एक्स्प्रेसमध्ये मोठा स्फोट
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 10, 2025 | 9:22 PM
Share

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामधील मस्तुंग जिल्ह्यात रविवारी पेशावरकडे निघालेल्या जाफर एक्स्प्रेसमध्ये आयईडीचा IED मोठा स्फोट झाला आहे. ही घटना रेल्वे स्पेजंड रेल्वे स्थानकाजवळ आली असताना घडली आहे. जाफर एक्स्प्रेस स्पेजंड रेल्वे स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर होती, त्याचवेळी रेल्वेमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर एक्स्प्रेसचे पाच डबे रुळावरून खाली घसरले. पाकिस्तानी रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या स्फोटामध्ये पाच व्यक्ती गंभीर जाखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

स्थानिक मीडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार या स्फोटामध्ये जवळपास पाच प्रवाशी गंभीर जाखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. स्फोटामुळे रेल्वेचे पाच डबे रुळावरून घसरले आहेत. रेल्वे डबे रुळावरून घसरल्यानं या भागातील सर्व रेल्वे वाहतूक ठप्प झाली असून, रेल्वे डबे बाजुला करण्याचं काम सुरू आहे. दरम्यान या अपघातानंतर आता या भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, सुरक्षा दलाकडून स्फोटासंदर्भात चौकशीला सुरुवात झाली आहे.

बलुचिस्थानमध्ये बलूच बंडखोर आणि दहशतवाद्यांकडून कायमच अशा प्रकारच्या कारवाया करण्यात येतात. यापूर्वी देखील अनेकदा पाकिस्तानमधील रेल्वे आणि वाहनांवर अशा प्रकारच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे हे दहशतवादी कृत्य असावं असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र हा स्फोट कोणी घडवून आणला? या मागे कोणत्या संघटनेचा हात आहे? याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाहीये.

दरम्यान बलचू नेता मीर यार याने आपल्या एक्स अकाउंटवर या रेल्वेचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत असताना त्याने म्हटलं की जाफर एक्स्प्रेसवर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे, या स्फोटामुळे रेल्वेचे पाच डबे रुळावरून घसरले. बलुचिस्थानमधील परिस्थिती आता पाकिस्तानी सैन्याच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. दरम्यान पाकिस्तान सरकारने येत्या 31 ऑगस्टपर्यंत बलुचिस्तानमधील इंटरनेट सेवा आणि मोबाईल सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.