AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Tariff: 88 देशांनी केला अमेरिकेचा गेम, महत्वाची सेवा ठप्प, ट्रम्प चिंतेत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर कर लादून खळबळ उडवून दिली होती. भारतावरही 50 टक्के कर लादण्यात आला होता. आता 88 देशांनी मिळून अमेरिकेला मोठा दणका दिला आहे.

US Tariff: 88 देशांनी केला अमेरिकेचा गेम, महत्वाची सेवा ठप्प, ट्रम्प चिंतेत
Sad Trump
| Updated on: Sep 07, 2025 | 9:48 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर कर लादून खळबळ उडवून दिली होती. भारतावरही 50 टक्के कर लादण्यात आला होता. मात्र अमेरिकेच्या या टॅरिफचा सर्वात मोठा फटका अमेरिकेला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय टपाल सेवांना बसला आहे. युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) ने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेला जाणारी टपाल वाहतूक 80 टक्क्यांहून अधिक कमी झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम अमेरिकन नागरिकांवर होताना दिसत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, जगभरातील 88 देशांमधील टपाल ऑपरेटर्सनी आपल्या सेवा काही काळासाठी किंवा कायमच्या स्थगित केल्या आहेत. सुरुवातील अमेरिकेने लहान वस्तूंवर सूट दिली होती. मात्र 29 ऑगस्टपासून सर्व टपाल सेवांवर कर लावण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय टपाल सेवा विस्कळीत झाली आहे.

अमेरिकन सरकारच्या या निर्णयामुळे जर्मनीची ड्यूश पोस्ट, ब्रिटनची रॉयल मेल आणि बोस्निया आणि हर्जेगोव्हिनासह अनेक देशांच्या टपाल सेवांनी अमेरिकेला जाणारे पार्सल घेणे बंद केले आहे. भारत, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, इटली आणि जपानसारख्या देशांनीही अमेरिकेला पार्सल पाठवण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.

टपाल वाहतूक 81 टक्क्यांनी घटली

UPU ने दिलेल्या आकडेवारीनुसार 29 ऑगस्टच्या आधी म्हणजे एका आठवड्यापूर्वीच्या तुलनेत अमेरिकेला जाणारी टपाल वाहतूक आता 81 टक्क्यांनी कमी झाली. 88 देशांमधील टपाल ऑपरेटर्सनी UPU ला सांगितले आहे की, टॅरिफच्या निर्णयावर तोडगा निघेपर्यंत अमेरिकेला जाणारी टपाल सेवा आम्ही थांबवली आहे. या 88 देशांच्या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय व्यापारासह खाजगी ग्राहकांवरही मोठा परिणाम झाला आहे.

UPU कडून उपाय शोधण्याचे काम सुरु

या सर्व प्रकरणावर बोलताना UPU चे महासंचालक मासाहिको मेटोकी यांनी सांगितले की, ‘टपाल सेवा पुन्हा सामान्य करण्यासाठी आम्ही जलद तांत्रिक उपाय शोधत आहोत.’ मात्र सेवा कधी पूर्ववत सुरु होईल याबाबत त्यांनी माहिती दिली नाही. UPU ही बर्न (स्वित्झर्लंड) स्थित संस्था आहे, जी 1874 मध्ये स्थापन झाली होती. या संस्थेत 192 देशांचा सहभाग आहे. ही संस्था आंतरराष्ट्रीय टपाल सेवांसाठी नियम बनवते आणि सदस्य देशांमध्ये सेवा पोहोचवण्याचे काम करते.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.