मोठी बातमी! बोट उलटून मोठा अपघात, 20 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
बोट उलटून भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये आतापर्यंत वीस जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे.

उत्तर -पश्चिम कांगोमध्ये पुन्हा एकदा बोट उलटून मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये वीस जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बेपत्ता झाले आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकाकडून अपघातस्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. मृताचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा अपघात माई-दोम्बे तलावामध्ये झाला आहे. प्रवाशांनी भरलेली एक नाव राजधानी किंशासाकडे निघाली होती. याचदरम्यान हा अपघात झाला. बोट पलटी झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. या अपघातामध्ये अनेकांचा मृ्त्यू झाला आहे. अपघातग्रस्त बोट ही किरी शहरातून राजधानी किंशासाकडे निघाली होती. त्याचवेळी रात्री आठच्या सुमारास बोबेनी आणि लोबेके गावाच्या दरम्यान माई-दोम्बे तलावामध्ये ही बोट पलटी झाली आहे. अपघाताचं वत्त समोर येताच या बोटीमध्ये असलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली असून, बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.
दरम्यान या बोटीमध्ये नेमके किती प्रवासी होते? त्यातील किती जणांचा मृत्यू झाला आहे? किती जणांना वाचवण्यात यश आलं आहे? तसेच किती जण अजूनही बेपत्ता आहेत, याची कोणतीही अधिकृत आकडेवारी अद्याप कांगो सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाहीये. या संदर्भात बोलताना माई न्दोम्बे प्रातांच्या गव्हर्नर यांनी सांगितलं की घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो आहोत. या अपघातामधून किती जण बचावले आहेत, त्याचा अधिकृत आकडा समोर आल्यानंतर किती जणांचा मृत्यू झाला आहे, याबाबतचा आकडा जाहीर केला जाणार आहे.
बोट अपघातांमध्ये वाढ
दरम्यान मध्य आफ्रिकेतील देशांमध्ये बोट दुर्घटनेच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, याचं मोठं कारण देखील समोर आलं आहे, या देशांमधील रस्त्यांची अतिशय खराब अवस्था आहे, त्यामुळे अनेक जण प्रवासासाठी रस्ते मार्गाचा वापर न करता जल मार्गाचा वापर करत आहेत, तसेच अशा प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटींमध्ये तिच्या शमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवण्यात येतात. परिणामी वजनाचा भार सहन न झाल्यानं अशा बोट अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. या अपघातामध्ये वीस जणांचा मृत्यू झाला आह, तर अनेक जण बेपत्ता आहेत.
