Blue Hunter’s Moon 2020 : एकाच महिन्यात दुसऱ्यांदा दिसणारा पूर्णाकृती चंद्राचा दुर्मिळ योग, कधी आणि कोठे पाहाल?

एकाच महिन्यात दुसऱ्यांदा दिसणारा पूर्णाकृती चंद्र म्हणजेच 'ब्ल्यू हंटर मून' पाहण्याचा योग जवळ आला आहे.

Blue Hunter’s Moon 2020 : एकाच महिन्यात दुसऱ्यांदा दिसणारा पूर्णाकृती चंद्राचा दुर्मिळ योग, कधी आणि कोठे पाहाल?
फोटो सौजन्य : गुगल
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 10:55 PM

मुंबई : एकाच महिन्यात दुसऱ्यांदा दिसणारा पूर्णाकृती चंद्र म्हणजेच ‘ब्ल्यू हंटर मून’ पाहण्याचा योग जवळ आला आहे. सायंकाळी उगवण्यास सुरुवात होत पूर्णाकृती होणाऱ्या या हंटर चंद्राची अनेक वैशिष्ट्यं आहेत. याला ब्ल्यू मून का म्हणतात, हा चंद्र नेमका कधी आणि कोठे पाहायला मिळणार अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत (Blue Hunter’s Moon 2020 Date and Timings in IST).

यंदाचा हा ब्ल्यू हंटर मून आजपासून बरोबर 4 दिवसांनी पाहायला मिळणार आहे. यानंतर आपल्याला निरभ्र आकाशात हा पूर्णाकृती चंद्र पाहता येणार आहे. हा चंद्र ऑक्टोबर महिन्यातील दोनदा पूर्णपणे दिसणारा चंद्र आहे. एकाच महिन्यात दोनदा असा पूर्ण चंद्र दिसणं ही असामान्य गोष्ट नसली तरी बरीच दुर्मिळ घटना आहे. याचं वैशिष्ट्यं म्हणजे हा चंद्र सायंकाळपासूनच उगवायला सुरुवात करतो.

हंटर्स ब्ल्यू मून कधी आणि कोठे पाहणार?

पंचांगानुसार हा दुर्मिळ हंटर ब्ल्यू मून 31 ऑक्टोबरला पाहता येणार आहे. भारतीय वेळेनुसार हा योग रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी पाहता येणार आहे.

हंटर मून काय आहे?

हंटर मून ही संकल्पना ऑक्टोबर महिन्यात दुसऱ्यांदा दिसणाऱ्या चंद्रासाठी वापरली जाते. मात्र, याआधी या महिन्यात हार्वेस्ट मून (Harvest Moon) देखील दिसावा लागतो. ऑक्टोबर महिन्याची सुरुवात हार्वेस्ट मूनने होते आणि नंतर 31 ऑक्टोबरला हंटर मूनचं दर्शन होतं.

याला ब्ल्यू मून का म्हणतात?

या चंद्राच्या नावात जो ब्ल्यू उल्लेख आहे त्याचा शब्दाशः रंगाशी काहीही संबंध नाहिये. कोणत्याही महिन्यात दुसऱ्यांदा पूर्णाकृती चंद्राला ब्ल्यू मून म्हणतात. हा चंद्र देखील सामान्य चंद्राप्रमाणे रात्रीच्यावेळी अंधारात सफेद राखाडी आणि प्रकाशमय दिसतो. त्याला सोनेरी किनारही पाहायला मिळते.

हेही वाचा :

चंद्राच्या पृष्ठभागावर सापडलं पाणी; नासाच्या शास्त्रज्ञांची मोठी घोषणा

Chandra Grahan 2020 | वर्षातील दुसऱ्या चंद्रग्रहणाचा योग, छायाकल्प चंद्रग्रहण म्हणजे काय?

Solar Eclipse Live : खगोलप्रेमींना सूर्यग्रहणाची पर्वणी, राजस्थानात कंकणाकृती, महाराष्ट्रात खंडग्रास

Ring Of Fire Solar Eclipse | कंकणाकृती सूर्यग्रहण येत्या रविवारी, 6 तास ग्रहणकाळ, सूर्यग्रहणाचं महत्त्व का?

Blue Hunter’s Moon 2020 Date and Timings in India IST

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.