AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Islamabad Blast : पाकिस्तान हादरला, राजधानी इस्लामाबादमध्ये मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट, 50 ठार

Islamabad Blast : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे. सुरक्षा पथकांनी इस्लामाबादला घेराव घातला आहे. 2026 या वर्षात पाकिस्तानात पहिल्यांदा इतका मोठा शक्तीशाली बॉम्बस्फोट झालाय.

Islamabad Blast : पाकिस्तान हादरला, राजधानी इस्लामाबादमध्ये मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट, 50 ठार
pakistan islamabad blast
| Updated on: Feb 06, 2026 | 3:52 PM
Share

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये आज नमाज पठणाच्यावेळी एका मशि‍दीमध्ये शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात 50 जण ठार झाले आहेत. 70 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या तीन हॉस्पिटल्समध्ये दाखल करण्यात आलय. पाकिस्तानी मिडिया डॉनने या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. रिपोर्टनुसार जखमींना पाकिस्तानच्या इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायसेज (पीआयएम) आणि सीडीए हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.

पाकिस्तानात अलीकडे झालेला हा मोठा दहशतवादी हल्ला आहे. स्फोटानंतर मृतदेहांचे अवयव इथे-तिथे विखरुन पडलेले होते. प्राथमिक दृष्टया हा आत्मघातकी हल्ला असल्याचं म्हटलं आहे. घटनास्थळी पोलीस आणि सैन्याची टीम पोहोचली आहे. सैन्याने पूर्ण भागाला घेराव घातला आहे. स्थानिक मीडियानुसार हा स्फोट कसर-ए-खदीजतुल कुबरा मशिदीत झालाय. इस्लामाबादमधील या मशि‍दीला बडी मशीद सुद्धा म्हटलं जातं. घटनेनंतर काही व्हिडिओ फुटेज व्हायरल झालय. यात लोक सैरावैरा पळताना दिसतायत. ब्लास्टनंतर खबरदारी म्हणून सगळ्या इस्लामाबादमध्ये इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे.

ती शिया समुदायाची मशीद मानली जाते

तारलाईच्या ज्या मशिदीत हल्ला झालाय. ती शिया समुदायाची मशीद मानली जाते. पाकिस्तानात शिया समुदायाची लोकसंख्या 2 कोटी आहे. पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येच्या हे प्रमाण 10 ते 12 टक्के आहे. नोव्हेंबर 2025 नंतर इस्लामाबादमध्ये झालेला हा दुसरा शक्तीशाली स्फोट आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये इस्लामाबाद कोर्टाच्या बाहेर स्फोट झाला होता. यात 12 लोकांचा मृत्यू झालेला. 36 जण जखमी झालेले. हा हल्ला तहरीक ए तालिबानने केला होता.

Follow Us
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!