AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रिटनचं खतरनाक प्लानिंग! थेट सूर्याशीच पंगा; 5 अब्ज खर्च करून महाभयंकर गोष्ट करणार

ब्रिटन सरकार सूर्याच्या तेजामध्ये घट करण्यासाठी शास्त्रज्ञांना प्रयोग करण्याची परवानगी देणार आहे. यासाठी 500 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. हे प्रयोग वातावरणात एरोसोल सोडून किंवा ढगांना अधिक चमकदार करून केले जाणार आहेत. मात्र, यामुळे पर्यावरणीय संतुलनात गडबड होण्याचा धोका आहे, अशी भीती व्यक्त केली जात आहे. शास्त्रज्ञ पूर्णपणे सुरक्षित आणि उलटता येणारे प्रयोग करण्याचे आश्वासन देत आहेत.

ब्रिटनचं खतरनाक प्लानिंग! थेट सूर्याशीच पंगा; 5 अब्ज खर्च करून महाभयंकर गोष्ट करणार
sun research
| Edited By: | Updated on: May 02, 2025 | 10:46 PM
Share

ग्लोबल वॉर्मिंगने घायाळ केलेलं असतानाच आता ब्रिटनने धक्कादायक पाऊल उचललं आहे. ब्रिटीश सरकार येत्या काही आठवड्यात सूर्याचं तेज कमी करण्यासाठी शास्त्रज्ञांना सूर्याचा प्रकाश कमी करण्याच्या प्रयोगाची परवानगी देणार आहे. म्हणजेच ब्रिटिश शास्त्रज्ञ थेट सूर्याशीच पंगा घेणार आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आणि शास्त्रज्ञांना खरोखरच असं करता येईल का? याचं कुतुहूलही वाढलं आहे.

या कामासाठी सुमारे 50 मिलियन पाऊंड (म्हणेज सुमारे 500 कोटी रुपये म्हणजेच 5 अब्ज) चा बजेटही तयार करण्यात आला आहे. पण या प्रयोगावर टीकाही होत आहे. हा प्रयोग ऐकायला चांगला वाटतो. पण तो तेवढाच धोकादायकही ठरू शकतो, असं जाणकार म्हणत आहेत.

सूर्याचं तेज कसं कमी करणार?

शास्त्रज्ञ एक खास टेक्निक तयार करत आहेत. त्याद्वारे हवेत खास प्रकारचे एरोसोल्स म्हणजे कण सोडणार आहेत. हे कण वातावरणातील सर्वात ऊंच लेअरवर त्याला स्ट्रॅटोस्फियर म्हणतात, तिथे पाठवले जातील. असं केल्याने सूर्याची काही किरणे पृथ्वीवर येणार नाहीत. त्यामुळे पृथ्वीचं तापमान थोडं कमी होईल. या शिवाय आणखी एक पद्धत आहे. ढगांना चमकदार बनवणे. ढग अधिक चमकदार केल्यास ते अधिक प्रकाश अंतराळात पाठवतील. त्यामुळे पृथ्वीवर गर्मी कमी जाणवेल.

धोके काय?

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही कल्पना ऐकायला खूप चांगली आहे. पण ती तितकीच धोकादायक ठरू शकते. वातावरणाच्या नैसर्गिक चक्रामध्ये गडबड होऊ शकते. त्यामुळे पावसाचा पॅटर्नही बदलू शकतो. वादळाची तीव्रता वाढू शकते. काही ठिकाणी दुष्काळ येऊ शकतो. त्यामुळेच शास्त्रज्ञ वारंवार हा प्रयोग करू नका म्हणून सांगत आहेत.

कोण करतय संशोधन?

या प्रकल्पाला ब्रिटनच्या अ‍ॅडव्हान्स्ड रिसर्च अ‍ॅण्ड इन्व्हेन्शन एजन्सी (ARIA) कडून निधी दिला जात आहे. या एजन्सीने जिओ-इंजिनीअरिंग संशोधनासाठी खास 50 दशलक्ष पाउंडचा निधी राखून ठेवला आहे. ARIA चे प्रोग्राम डायरेक्टर, प्राध्यापक मार्क साइम्स यांनी सांगितले आहे की, आम्ही सुरक्षित डिझाईनच्या माध्यमातून संशोधन करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहोत. कोणताही प्रयोग तेव्हाच केला जाईल जेव्हा तो पूर्णपणे उलटवता येईल आणि पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही.

त्यांनी हेही सांगितले की, ज्यांना फंडिंग दिले जाईल त्या वैज्ञानिकांची नावे काही आठवड्यांत जाहीर केली जातील. तसेच हेही सांगितले जाईल की छोटे-छोटे बाह्य प्रयोग (आउटडोअर एक्सपेरिमेंट्स) केव्हा आणि कुठे केले जातील.

10 वर्षांत येऊ शकतो मोठा बदल जर हे प्राथमिक प्रयोग यशस्वी ठरले, तर वैज्ञानिकांना आशा आहे की ही तंत्रज्ञान पुढील 10 वर्षांत मोठ्या प्रमाणावर वापरता येईल. म्हणजेच भविष्यात, ग्लोबल वॉर्मिंगशी लढण्यासाठी आपल्या हातात सर्वात मोठे शस्त्र सूर्यकिरणांना थोडेसे वळवण्याची तंत्रज्ञान असू शकते.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.