Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, 100 टक्के टॅरिफच्या धमकीला जशास तसं उत्तर, कॅनडाचा मोठा दणका!
अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट 100 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. या धमकीनंतर कॅनडाने आता ट्रम्प यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.

Canada Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अगोदरपासूनच ‘अमेरिका फस्ट’ असे धोरण राहिलेले आहे. या धोरणाअंतर्गत मूळच्या अमेरिकन लोकांनाच नोकरी, व्यवसाय यात कसे प्राधान्य दिले जाईल, याचा विचार अमेरिकन सकारकडून केला जातो. यात मोहिमेचा एक भाग म्हणून अमेरिका इतर काही देशांवर टॅरिफ लागू करत आहे. टॅरिफ लावून व्यापारविषयक तूट भरून काढण्याचा अमेरिकेकडून केला जातो. नुकतेच ट्रम्प यांनी कॅनडा या देशाने चीनसोबत व्यापार करार केला तर आम्ही कॅनडावर 100 टक्के टॅरिफ लावू अशी थेट धमकीच दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीनंतर आता कॅनडाने प्रतिक्रिया दिली आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया खात्यावर एका व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी एका प्रकारे अमेरिकेच्या धोरणाविरोधातील नितीच स्पष्ट केली आहे.
मार्क कार्नी यांनी नेमका काय संदेश दिला?
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी साधारण एका मिनिटाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी देशाच्या स्वावलंबनावर भाष्य केले आहे. तसेच ट्रम्प यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टॅरिफच्या धमकीला उत्तर दिले आहे. त्यांनी एका प्रकारे आत्मनिर्भर कॅनडाचे धोरण अवलंबल्याचे म्हटले जात आहे. ‘कॅनडाच्या अर्थव्यवस्थेवर सध्या परदेशी संकट आहे. त्यामुळेच आता कॅनडाच्या जनतेने एक पर्याय निवडला आहे. ज्या गोष्टीला आपण नियंत्रित करू शकतो, त्यावरच आता लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. कॅनडाचे नागरिक आता कष्टाने कमवलेले पैसे हे कॅनडातील व्यवसायिक, कॅनडातील कामगार यांच्यावरच खर्च केले जातील. कॅनडाचे नवे सरकारदेखील स्वावलंबनाचेच धोरण स्वीकारत आहे,’ असे कार्नी या व्हिडीदओ संदेशात म्हणाले आहेत.
दरम्यान, कॅनडाच्या पंतप्रधानांनी शेअर केलेला व्हिडीओ म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्युत्तर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता ट्रम्प नेमकी काय भूमिका घेणार का? अमेरिका कॅनडावर 100 टॅरिफ लागू करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
