चिलीच्या राष्ट्रपतींना महिलेसोबतची सेल्फी महागात, 3500 डॉलरचा दंड, काय प्रकरण?

सेबेस्टियन पिनेरा यांना या प्रकरणी सार्वजनिकपणे माफी मागावी लागली. Chile President Sebastian Pinera not wearing Mask

चिलीच्या राष्ट्रपतींना महिलेसोबतची सेल्फी महागात, 3500 डॉलरचा दंड, काय प्रकरण?

सैंटियागो: जगातील 7.55 कोटी नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झालाय. आतापर्यंत 16.7 लाख लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. जगातील काही देशांमध्ये कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी कडक नियम बनवले आहेत. मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास दंड केला जातोय. कोरोना विषयक खबरदारी घेण्याचे नियम सामान्य नागरिक आणि राजकीय नेते, उच्चवर्गीयांसाठी सारखे ठेवण्यात आले आहेत. दक्षिण अमेरिकेतील चिली या देशाचे राष्ट्रपती सेबेस्टियन पिनेरा (Sebastian Pinera)  देखील कोरोना नियम न पाळल्यामुळं अडचणीत आले त्यांना मास्क (Mask)न वापल्यामुळे 3500 डॉलर दंड भरावा लागला.

चिलीचे राष्ट्रपती सेबेस्टियन पिनेरा (Sebastian Pinera)  यांनी एका मास्क (Mask) न घातलेल्या महिलेसोबत सेल्फी काढली होती. महिलेचे राष्ट्रपतींसोबतचे मास्क न घातलेले फोटो व्हायरल झाले. यानंतर राष्ट्रपतींना कोरोना नियम न पाळल्याबद्दल दोषी मानण्यात आले. सेबेस्टियन पिनेरा यांना या प्रकरणी सार्वजनिकपणे माफी मागावी लागली. राष्ट्रपतींना दंड देखील भरावा लागला आहे. 3500 डॉलर म्हणजेच अडीच लाख रुपये दंड भरावा लागला. चिलीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार राष्ट्रपतींनी एका महिलेसोबत सेल्फी काढली होती. हे कोरोना नियमांचे उल्लंघन असून त्यांच्याकडून 3500 डॉलर रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आलीय.

चिलीमध्ये कडक नियम

दक्षिण अमेरिकेतील चिलीमध्ये कोरोनाविषयक कडक नियम लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे गुन्हा ठरवण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आणि तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे. सेबेस्टियन पिनेरा (Sebastian Pinera)  यांनी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सेल्फी काढली होती, त्यानंतर तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

राष्ट्रपतींनी मागितली माफी

सेबेस्टियन पिनेरा यांनी विनामास्क सेल्फी प्रकरणी सार्वजनिकपणे माफी मागत नियमभंग केल्याचे स्वीकारले आहे. काचागुआमध्ये घराजवळ फिरत असताना एका महिलेने ओळखले आणि तिने सेल्फी घेण्याचा आग्रह केला. त्यामुळे सेल्फी काढल्याचं पिनेरा म्हणाले. मात्र, सेल्फी काढताना मास्क घालणं आवश्यक होतं, असंही ते म्हणाले.

पिझ्झा पार्टीवरुन वादात

राष्ट्रपती पिनेरा यापूर्वीही वादात अडकले होते. चिलीच्या राजधानीत सैंटियागोमध्ये विषमतेविरुद्ध आंदोलन सुरु होते. त्यावेळी राष्ट्रपतींनी पिझ्झा पार्टी केली होती, त्यामुळं ते वादात अडकले होते.

संबंधित बातम्या:

लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई नको, ‘या’ कारणांमुळे आदर पुनावाला यांची सरकारकडे मागणी

पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी फ्रंटलाइन कामगार का?; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI