जग संकटात, डोनाल्ड ट्रम्प यांची एक चूक जगावर भारी, विनाशकारी दिशेने पाऊल, धक्कादायक खुलासा..
डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे संपूर्ण जग अडचणीत आल्याचे बघायला मिळतंय. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा रस फक्त आणि फक्त जगातील युद्धे पेटवून देऊन थांबवण्यात आहेत. आता नुकताच एक हैराण करणारा खुलासा करण्यात आलाय.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून जगातील युद्धे रोखण्यात व्यस्त आहेत आणि तिकडे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले. डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला स्थिर करण्यासाठीच डोनाल्ड ट्रम्प विविध कारणे सांगून टॅरिफ आकारत आहेत. अमेरिकेची वाईट आर्थिक परिस्थिती लपून राहिलेले नाही. टॅरिफमुळे अर्थव्यवस्थेला नवी संजीवनी मिळेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांना वाटले. मात्र, त्यांचा हा निर्णय त्यांच्यावरच उलटा पडताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेच्या समस्या आणखी वाढल्या आहेत. अब्जाधीश गुंतवणूकदार रे डालिओ यांनी वॉल स्ट्रीटपासून व्हाईट हाऊसपर्यंत सर्वांना हादरवून टाकणारा अमेरिकन अर्थव्यवस्थेबद्दल इशारा दिला आहे, ज्यामुळे एकच खळबळ उडाली.
2008 मधील मंदीविषयी रे डालिओ यांनी अगोदरच भाष्य केले होते. आता त्यांनी परत मंदीविषयी मोठा इशारा दिल्याने धोक्याची घंटा जवळच असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. अमेरिकेचे सार्वजनिक कर्ज इतके वाढले आहे की धक्कादायक परिस्थिती आहे. जर आताच यावर उपायोजना केल्या नाही तर अमेरिकेसाठी आर्थिक हृदयविकाराचा झटका नक्कीच येऊ शकतो. ब्रिजवॉटर असोसिएट्सचे संस्थापक डालिओ यांनी नुकताच एक मुलाखत ब्लूमबर्गला दिला.
मुलाखतीमध्ये बोलताना रे डालिओ यांनी म्हटले की, सध्या अमेरिकेची आर्थिक परिस्थिती अशा व्यक्तीसारखी आहे ज्याच्या रक्तवाहिन्या बंद आहेत. रक्त म्हणजेच पैसा वाहणे थांबले आहे. संपूर्ण व्यवस्था संकटात आहे. यूएस काँग्रेसनल बजेट ऑफिस (CBO) नुसार, 2024 मध्ये यूएस सार्वजनिक कर्ज GDP च्या 99 टक्के पर्यंत पोहोचेल. पुढच्या दहा वर्षात 2034 पर्यंत हा आकडा नक्कीच 116 टक्के पेक्षा जास्त होईल. ही अमेरिकेवर अत्यंत मोठी आर्थिक मंदी असल्याचे त्यांनी म्हटले.
रे डालिओ यांनी ट्रम्प प्रशासनावर गंभीर आरोप करत त्यांना याकरिता जबाबदार धरत म्हटले की, टॅरिफ आणि धोरणात्मक निर्णयांमुळे अमेरिकेची आर्थिक स्थिरता कमकुवत झाली आहे. कर्ज, टॅरिफ आणि सत्ता संघर्ष हे तिघेही आतून आर्थिक व्यवस्थेला खाऊन टाकत आहेत. रे डालिओ यांनी केलेल्या दाव्यानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. हेच नाही तर अमेरिकेची अर्थव्यवस्थात किती वाईट स्थितीत आहे हे त्यांनी स्पष्ट सांगितले.
