2014 च्या मॅडिसन स्क्वेअरपासून ते हाऊडी मोदी आणि आताची जो बायडन भेट, वाचा पंतप्रधान मोदींच्या 7 अमेरिकेच्या दौऱ्याबद्दल सविस्तर

आज आपण मोदींच्या याआधीच्या 7 दौऱ्यांबद्दल जाणून घेऊया, ज्यात 2014 मध्ये मॅडिसन स्क्वेअरपासून हाऊडी मोदी आणि बायडन यांच्या भेटीच्या कार्यक्रमाचा समावेश आहे.

2014 च्या मॅडिसन स्क्वेअरपासून ते हाऊडी मोदी आणि आताची जो बायडन भेट, वाचा पंतप्रधान मोदींच्या 7 अमेरिकेच्या दौऱ्याबद्दल सविस्तर
आज आपण मोदींच्या याआधीच्या 7 दौऱ्यांबद्दल जाणून घेऊया

वॉशिंग्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या 3 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अमेरिका दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ते आज अमेरिकेचे राष्ट्रपती जो बिडेन यांची भेट घेणार आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेतली. भारताचे पंतप्रधान म्हणून मोदींची ही सातवी अमेरिका भेट आहे. पहिल्या अमेरिकेच्या दौऱ्यानंतर, पीएम मोदींच्या आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी मैत्रीच्या चर्चा जगभरात रंगल्या होत्या.

हेच नाही तर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पीएम मोदींसाठी हाऊडी मोदी कार्यक्रमाचं अमेरिकेत आयोजन केले होतं. हा कार्यक्रमही जगभरात खूप लोकप्रिय झाला होता. त्यामुळेच आज आपण मोदींच्या याआधीच्या 7 दौऱ्यांबद्दल जाणून घेऊया, ज्यात 2014 मध्ये मॅडिसन स्क्वेअरपासून हाऊडी मोदी आणि बायडन यांच्या भेटीच्या कार्यक्रमाचा समावेश आहे.

2014: पंतप्रधान म्हणून अमेरिकेला पहिला दौरा

2014 च्या मे महिन्यात पंतप्रधान म्हणून निवड झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सप्टेंबर महिन्यात पहिला अमेरिका दौरा केला. पंतप्रधान म्हणून पंतप्रधान मोदींचा हा पहिला अमेरिका दौरा खूप लोकप्रिय होता. पंतप्रधान मोदींनी मॅडिसन स्क्वेअरमध्ये दिलेल्या भाषणाने अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची मनं जिंकली. अमेरिकेत पंतप्रधान मोदींच्या हिंदी भाषणामुळे बरेच मथळे छापून आले. या भेटीदरम्यान अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीवर अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टमध्ये संपादकीय छापण्यात आलं.

2015: संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला मोदींची हजेरी

त्याच्याच पुढच्या वर्षात म्हणजे 2015 च्या सप्टेंबर महिन्यात मोदी पुन्हा एकदा अमेरिकेत पोहोचले. यावेळी ते संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित करण्यासाठी अमेरिकेत गेले होते. भेटीदरम्यान त्यांनी अनेक टेक कंपन्यांच्या प्रमुखांसोबत बैठका घेतल्या. यावेळी फेसबुक, टेस्ला, गुगल सारख्या कंपन्यांनाही भेटी दिल्या. एवढेच नाही, तर यावेळी त्यांनी परदेशी भारतीयांच्या एका कार्यक्रमाला संबोधित केलं, ज्याची खूप चर्चा झाली.

2016 मध्ये अमेरिकेचे सलग 2 दौरे

2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला दोनदा भेटी दिल्या. मार्च महिन्यात पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या अण्विक सुरक्षा शिखर परिषदेसाठी अमेरिकेत पोहचले. त्यानंतर जूनमध्ये, पीएम मोदींनी अमेरिकन संसदेच्या युनायटेड हाऊसलाही संबोधित केलं. असा सन्मान मिळवणारे पीएम मोदी हे पाचवे पंतप्रधान आहेत.

2017: मोदी आणि ट्रम्प यांची पहिली भेट

पंतप्रधान मोदी यांनी जून 2017 मध्ये अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा व्हाईट हाऊसमध्ये पीएम मोदींसाठी जेवणाचं आयोजन केलं होतं. या दौऱ्याचा भारताला खूप फायदा झाला, याच भेटीनंतर अमेरिकेने सय्यद सलाहुद्दीनचा जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला.

2019: हाऊडी मोदी कार्यक्रम

2019 मध्ये, सप्टेंबर महिन्यात, पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा अमेरिकेत पोहोचले. या दरम्यान, ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी हाऊडी मोदी कार्यक्रमाचे आयोजन केले. अमेरिकेत निवडणूक प्रचाराची ही वेळ होती. या दरम्यान, पीएम मोदींनी परदेशी भारतीयांना संबोधित केलं. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्रम्प यांच्यासोबत स्टेडियमची संपूर्ण फेरी मारली.

2021: सातवा अमेरिका दौरा

कोरोना संकटानंतर पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळच्या दौऱ्याचा फोकस हा क्वाड देशांची बैठक आहे, याशिवाय, अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनाची भेट महत्त्वाची आहे. या बैठकीदरम्यान द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. याआधी पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचीही भेट घेतली.

हेही वाचा:

लोकशाहीपासून कोरोनापर्यंत आणि पाकिस्तानपासून अंतराळापर्यंत मोदी-कमला हॅरीस यांच्यात चर्चा, भारतभेटीचंही निमंत्रण

पाकने भारतात अफगाण दहशतवादी पाठवले, मोठ्या हल्ल्याची शक्यता, अलर्ट जारी

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI