AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : भारताच्या हल्ल्यात नक्की मेलं कोण? हाफिज सईद की मसूद अजहर? पाकिस्तानी राष्ट्रपतीनी जनाजासाठी फुलं का पाठवली?

भारताने ऑपरेशन सिंधू अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर मध्यरात्री हल्ले केले. मुरीदके आणि बहावलपूर येथील हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाले. एक रहस्यमय ताबूत आणि त्यावर झालेल्या दफनविधीमुळे हाफिज सईद किंवा मसूद अजहर यांच्या मृत्यूची चर्चा रंगली आहे. पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी या दफनविधीला उपस्थित होते, यामुळे ही शंका आणखी बळकट झाली आहे.

Operation Sindoor : भारताच्या हल्ल्यात नक्की मेलं कोण? हाफिज सईद की मसूद अजहर? पाकिस्तानी राष्ट्रपतीनी जनाजासाठी फुलं का पाठवली?
भारताच्या हल्ल्यात नक्की मेलं कोण? हाफिज सईद की मसूद अजहर? Image Credit source: social media
| Updated on: May 08, 2025 | 2:10 PM
Share

भारताने पाकिस्तानातील अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर मध्यरात्री जोरदार हल्ले केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हे हल्ले करून अतिरेक्यांचे अड्डेच जमीनदोस्त करण्यात आले आहेत. भारताने अवघ्या 25 मिनिटात पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमधील पाच ठिकाणी आणि पाकिस्तानात थेट घुसून चार ठिकाणी हल्ले केले आहेत. भारताने अतिरेक्यांचे एकूण 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत. भारताने ज्या ज्या ठिकाणी हल्ले केले त्यात मुरीदके येथील हाफिज सईद आणि बहावलपूर येथील मौलाना मसूद अजहरच्या ठिकाण्यांचाही समावेश आहे.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत बहावलपूरच्या मरकज सुभान अल्लाहला मिसाईल अटॅकने जमीनदोस्त करण्यात आलं आहे. खतरनाक दहशतवादी मसूद अजहरच्या सर्वात मोठ्या ठिकाण्यापैकी हा महत्त्वाचा ठिकाणा मानला जातो. मरकज तैयबावरही भारताने हल्ला केला आहे. मुरीदकेमध्ये मरकज तैयबा आहे. दहशतवाद्यांचा आका हाफिज सईदचा हा टेरर प्वॉइंट आहे. तोच भारताने नष्ट करून टाकला आहे. या दोन्ही महत्त्वाच्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात असंख्य अतिरेकी मारले गेले आहेत. या अतिरेक्यांचा दफनविधीही झाला आहे. पण यातील एक ताबूत अत्यंत महत्त्वाचा असल्याचं सांगितलं जात आहे. या ताबूतचं थेट कनेक्शन हाफिज सईद किंवा मसूद अजहरशी असल्याचीही चर्चा आहे.

बडे अधिकारी आले

ज्या पद्धतीने पाकिस्तानात या एका ताबूतला विशेष ट्रिट केलं जात आहे, त्यावरून चर्चांना उधाण आलं आहे. भारताच्या हल्ल्यात हाफिज सईद किंवा मसूद अजहर या दोघांपैकी एकजण ठार झाला असून त्यांच्यापैकी एकाचंच हे ताबूत असल्याची चर्चा आहे. या ताबूतमधील दहशवाद्याच्या दफनविधीला पाकिस्तानातील असंख्य नागरिक आले होते. एवढेच नव्हे तर पाकिस्तानच्या लष्कराचे बडे अधिकारीही आले होते. त्यामुळे दफनविधीला पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी यायला असा कोणता मोठा अतिरेकी मेला आहे? तो हाफिज किंवा मसूद तर नाही ना? अशी चर्चा रंगली आहे. इतर अतिरेक्यांच्या दफनविधीला गर्दी नव्हती आणि पाकिस्तानी लष्करातील कोणताही अधिकारी नव्हता, त्यामुळे या चर्चांना आता बळ मिळू लागलं आहे.

ताबूत समोर नमाज पठण

हे ताबूत पाहून कोणी तरी मोठा अतिरेकी मेल्याचं दिसत आहे. पाकिस्तानकडून या जनाजावर फुलं चढवली जात आहे. त्यातील एका गुच्छावर COAS (म्हणजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ) लिहिलं आहे. तर दुसऱ्या गुच्छावर राष्ट्रपती लिहिलेलं आहे. तर एका दुसऱ्या ताबूतच्या समोर बसून लष्कर कमांडर हाफिज अब्दुल रउफ यांनी नमाज पठण केलं. या तीन पुराव्यामुळे आता हा ताबूत कुणाचा? भारताच्या हल्ल्यात नक्की कोण मारलं गेलं? हाफिज सईद की अजहर मसूद मारला गेला? असा सवाल आता केला जात आहे.

इतका मोठा दहशतवादी?

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात दहशतवाद्याच्या ताबूतवर फुलं चढवली जात आहे. त्यावर COAS (म्हणजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ) लिहिलंय. म्हणजे पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख आसिम मुनीर यांनी हे फूल मेलेल्या दहशतवाद्यासाठी पाठवलं आहे. पाकच्या सैन्यप्रमुखाने आणि राष्ट्रपतीने फूल पाठवावेत इतका मोठा दहशतवादी मेला का? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.

पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांनीही दहशतवाद्याच्या मृत्यूनंतर फुलं पाठवली आहेत. त्यामुळेच हा दहशतवादी नेमका कोण आहे? अशी चर्चा आता रंगली आहे. या ताबूत समोर लष्करचा कमांडर हाफिज अब्दुल रऊफ यांनी नमाज पठण केलं. तर इतर पाकिस्तानी सैनिकांनी दु:ख व्यक्त केलं. जणू काही त्यांचा बडा अधिकारी किंवा पालनकर्ताच गेला की काय अशा अविर्भावात हे सैनिक दिसत आहेत. त्यामुळेच भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानातील बडा अतिरेकी मेल्याची चर्चा जोर धरताना दिसत आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.