डोनाल्ड ट्रम्प दारू पितात का? महासत्तेच्या प्रमुखाबाबत हे माहीत असायलाच हवं
Donald Trump : अमेरिकेत दारूचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प दारू पितात का? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर सांगणार आहोत.

गेल्या काही काळापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चर्चेत आहेत. त्यांनी जगातील जवळपास प्रत्येक देशावर कर लादलेला आहे. त्याच बरोबर ट्रम्प हे आपल्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळेही नेहमीच चर्चेत असतात. याआधी अनेकदा त्यांचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत आलेले आहे. अमेरिकेत दारूचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प दारू पितात का? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर सांगणार आहोत.
डोनाल्ड ट्रम्प हे दारू पितात का? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी आयुष्यभर दारू पिणे टाळले आहे. ते कोणत्याही प्रकारचे मद्यपान करत नाही. मोठ्या रॅलींमध्ये, कार्यक्रमांमध्ये किंवा जागतिक नेत्यांसोबतच्या भेटीत ते वाइन किंवा व्हिस्की पीत नाहीत. या ऐवजी ते डाएट कोक पितात. त्यांची ही सवय इतकी प्रसिद्ध आहे की व्हाईट हाऊसमध्ये डाएट कोक मागवण्यासाठी एक लाल बटण देखील लावण्यात आले होते.
डोनाल्ड ट्रम्प दारूपासून दूर
डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीही जाहीरपणे सांगितलेले आहे की, त्यांनी कधीही दारूचा एक थेंबही पिलेला नाही. अनेकदा गंमत करताना त्यांनी म्हटले की, “जर मी दारू प्यायलो तर मी जगातील सर्वात वाईट व्यक्ती असेन.” ट्रम्प यांच्या जवळच्या लोकांनीही ट्रम्प हे कधीच दारू पिलेले नाहीत असं म्हटलेले आहे. दारूऐवजी ते फक्त पाणी आणि डाएट कोक पितात. ट्रम्प हे दारू का पीत नाहीत यामागे एक कहाणी देखील आहे.
या घटनेने डोनाल्ड ट्रम्प यांची विचारसरणी बदलली
डोनाल्ड ट्रम्प पाच भावंडांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांचा मोठा भाऊ फ्रेड ट्रम्प ज्युनियर हा पायलट होता, मात्र दारूच्या व्यसनामुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. कारण दारुमुळे 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. फ्रेड नेहमी डोनाल्ड यांना दारू पिऊ नका असे सांगायचा. यामुळे ट्रम्प यांनी आयुष्यभर दारू पिणे टाळले. ट्रम्प यांचे चरित्रकार ग्वेंडा ब्लेअर यांनी म्हटले की, ट्रम्प यांनी त्यांच्या भावाची अवस्था पाहिलेली आहे. त्यामुळे त्यांनी ठरवले आहे की ते कधीही दारूला स्पर्श करणार नाहीत.
