टॅरिफ बॉम्बनंतर असं पहिल्यांदाच घडणार, ट्रम्प आणि मोदी लवकरच… काहीतरी वेगळं होण्याची शक्यता!
सध्या अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध कमालीचा ताणले गेले आहेत. असे असतानाच आता लवकरच नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Donald Truml : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडच्या काळात घेतलेल्या काही निर्णयांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणलेले आहेत. रशियाची कोंडी व्हावी यासाठी ट्रम्पय यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. तसेच अलिकडे ट्रम्प यांनी एचवनबी व्हिसाचे शुल्क वाढवले असून याचा सर्वाधिक फटका भारताला बसणार आहे. ट्रम्प यांनी वारंवार भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबावावे असा इशाराही दिलेला आहे. या सर्व घडामोडी घडत असताना भारत-अमेरिका यांच्यात मैत्रीचे बंध पुन्हा जुळावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असे असतानाच आता एक महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर येत आहे. लवकरच डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होण्याची शक्यता आहे. तसे संकेत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिले आहेत.
क्वाड परिषद लवकरच होणार
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील एका अधिकाऱ्याने भारत-अमेरिका संबंधांवर भाष्य केले आहे. तसेच या अधिकाऱ्याने भविष्यात ट्रम्प-मोददी यांची भेट होऊ शकते, असेही संकेत दिले आहेत. क्वाड शिखर परिषद या वर्षाच्या शेवटी किंवा आगामी वर्षात आयोजित केली जाण्याची शक्यता आहे, यावेळी भारत या परिषदेचे आयोजन करेल. 2024 सालची क्वाड परिषद ही अमेरिकेतील विलमिंग्टन येथे पार पडली होती.
मोदी-ट्रम्प यांच्या भेटीवर काय भाष्य केले
या अधिकाऱ्याने मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीवरदेखील भाष्य केले आहे. “मी आमच्या राष्ट्राध्यक्षांच्या वतीने या बैठकीबाबत अगोदरस सांगणे योग्य होणार नाही. मात्र मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही मोदी आणि ट्रम्प यांची भेट झालेली पाहणार आहात. या दोन्ही नेत्यांमध्ये चांगले संबंध आहेत,” असे विधान या अधिकाऱ्याने केले. तसेच आम्ही क्वाड परिषदेच्या आयोजनावर सध्या काम करत आहोत. ही परिषद लवकरच होणार आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
भारत-अमेरिकेच्या संबंधावर काय सांगितले?
या अधिकाऱ्याने भारत-अमेरिकेच्या संबंधावरही भाष्य केले आहे. येणाऱ्या काही महिन्यांत भारत-अमेरिकेच्या संबंधात सकारात्मक प्रगती होईल, अशी अपेक्षा या अधिकाऱ्याने व्यक्त केली. आमच्यात काही मतभेद आहेत. पण आम्ही हे मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत, हे गेल्या काही आठवड्यांपासून हे स्पष्ट झाले आहे. रशियासोबतचा व्यापर आणि तेल खरेदी यावर समाधान शोधण्याचा आम्ही दोन्ही देश प्रयत्न करत आहोत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, अमेरिकन अधिकाऱ्याच्या या दाव्यानंतर आता ट्रम्प-मोदी यांची भेट होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
