भारताने फेटाळला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा दावा, डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात संवाद नाहीच, जगापुढे…
डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी केलेल्या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली. भारत सरकाकडून तेल खरेदी बंद करणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. आता भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचा खोटारडेपणा जगापुढे आणलाय.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला हादरवणारा दावा केला आणि एकच खळबळ उडाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, माझे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोनवर बोलणे झाले असून रशियाकडून होणाऱ्या तेल आयातीवर ते चिंतेत आहेत. नरेंद्र मोदी यांनी मला स्पष्ट सांगितले की, भारत हा आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. आता भारताकडून डोनाल्ड ट्रम्प यांना तोंडावर पाठण्यात आले असून डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला आहे. सरकारने सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संवाद झाला नाही.
गुरुवारी एका पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) सांगितले की, ट्रम्पच्या दाव्यांना उत्तर देण्यासाठी आधीच आम्ही एक निवेदन जारी केले आहे. दोन्ही नेत्यांमधील फोन संवाद किंवा काही चर्चांबद्दल बोलायचे झाले तर काल कोणत्याही प्रकारचा फोन दोन्ही नेत्यांमध्ये झालेला नाही. भारताने आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर थेट म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात कोणताही फोन झाला नाही आणि संवादही नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांसोबत संवाद साधताना म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून झालेल्या संभाषणात त्यांना आश्वासन दिले होते की, नवी दिल्ली रशियाकडून तेल खरेदी थांबवेल आणि युक्रेनमधील युद्धावरून मॉस्कोला एकाकी पाडण्याच्या त्यांच्या प्रयत्नात हे मोठे पाऊल असेल, खरोखरच भारताने मोठे पाऊस उचलल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.
बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यावर गुरूवारी बोलताना भारताने स्पष्टपणे म्हटले की, असा कोणताही फोन झाला नाहीये. फोन झाला नाही म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा पूर्णपणे खोटा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना काहीही करून भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी ही अपेक्षा आहे. त्याकरिता ते सर्व प्रयत्न करताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टॅरिफच्या तणावात अमेरिकेचा दाैरा देखील रद्द केला.
