AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi-Donald Trump : ट्रम्प यांची मुंबई हल्ल्याचा खतरनाक दहशतवादी भारताला सोपवण्याची घोषणा

PM Modi-Donald Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मुंबईवरील हल्ल्याचा खतरनाक दहशतवादी भारताकडे सुपूर्द करण्यास डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजुरी दिली आहे.

PM Modi-Donald Trump : ट्रम्प यांची मुंबई हल्ल्याचा खतरनाक दहशतवादी भारताला सोपवण्याची घोषणा
Mumbai Attack
| Updated on: Feb 14, 2025 | 9:22 AM
Share

मुंबईवर 2008 साली झालेल्या 26/11 हल्ल्याच्या आठवणी आजही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तहव्वुर राणा या दहशतवाद्याला भारताच्या ताब्यात देण्यास अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजुरी दिली आहे. त्याला न्यायाचा सामना करावा लागेल असं ट्रम्प म्हणाले. मागच्या महिन्यात तहव्वुर राणाच भारताला प्रत्यर्पण करण्यास अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली होती. पाकिस्तानी वंशाचा कॅनडाई बिझनेसमन तहव्वुर राणाने 2008 सालच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याला दोषी ठरवण्यात आलं आहे.

भारताने अमेरिकी एजन्सीसोबत डिटेल्स शेअर केली होती. तिथल्या सत्र न्यायालय आणि सुप्रीम कोर्टात या गोष्टी मांडण्यात आल्या. भारताने दिलेले पुरावे अमेरिकी कोर्टाने मान्य केले. भारताने दिलेल्या कागदपत्रात 26/11 हल्ल्यात तहव्वुर राणाच्या भूमिकेची माहिती दिली होती.

कोण आहे तहव्वुर राणा?

मुंबई पोलिसांनी 26/11 दहशतवादी हल्ल्यासंबंधी आपल्या आरोपपत्रात तहव्वुर राणाच्या नावाचा समावेश केला होता. त्याच्यावर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI आणि दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाचा सक्रीय सदस्य म्हणून काम केल्याचा आरोप आहे. चार्जशीटमध्ये राणावर आरोप आहे की, त्याने 26/11 दहशतवादी हल्ल्यााचा मास्टरमाइंड डेविड कोलमॅन हेडलीची मदत केली. मुंबईत कुठे-कुठे हल्ले करायचे, त्या जागांची रेकी तहव्वुर राणाने केली होती. प्लान बनवून पाकिस्तानी दहशतवाद्यांना सोपवला होता.

डेविड कोलमॅन हेडली कोण?

तहव्वुर राणा आणि डेविड कोलमॅन हेडली उर्फ दाउद सईद गिलानी बालपणीचे मित्र आहेत. हेडली एक अमेरिकी नागरिक आहे. त्याची आई अमेरिकी आणि वडिल पाकिस्तानी होते. अमेरिकी अधिकाऱ्यांनी ऑक्टोंबर 2009 मध्ये शिकागोमधून हेडलीला अटक केली होती. अमेरिकी कोर्टाने 24 जानेवारी 2013 रोजी हेडलीला मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्या प्रकरणी दोषी ठरवून 35 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. तहव्वुर राणाने पाकिस्तानच्या हसन अब्दाल कॅडेट स्कूलमध्ये शिक्षण घेतले. हेडलीने सुद्धा अमेरिकेत शिफ्ट होण्याच्या पाच वर्ष आधी तिथे शिक्षण घेतले होते.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.