AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

150 ते 200 टक्के टॅरिफ लादण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची भारतासह या देशाला धमकी, थेट मोठा दावा, म्हणाले, मी…

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह चीनवर मोठा टॅरिफ लावून टॅरिफ काय काय चांगले घडले हे सांगत फिरताना दिसत आहेत. आता त्यांनी अत्यंत मोठा दावा पुन्हा एकदा केल्याचे बघायला मिळतंय.

150 ते 200 टक्के टॅरिफ लादण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची भारतासह या देशाला धमकी, थेट मोठा दावा, म्हणाले, मी...
Donald Trump tariff on India
| Updated on: Oct 14, 2025 | 12:14 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा शांतता शिखर परिषदेमध्ये भारत-पाकिस्तान संबंधांवर मोठे भाष्य केले. हेच नाही तर यावेळी उपस्थित पाकिस्तानच्या पंतप्रधानांना देखील त्यांनी मोठा प्रश्न विचारला. भारत-पाकिस्तान युद्ध रोखल्याचा दावा करताना मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प दिसत आहेत. आता थेट भर मंचावर त्यांनी भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य करत भविष्यात हे दोन्ही देश खूप चांगले राहतील, असे म्हटले. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील तणावाच्या परिस्थितीवर त्यांनी भाष्य केले. मी काही युद्धे फक्त टॅरिफच्या आधारे सोडवली, असे त्यांनी म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, उदाहरणार्थ भारत आणि पाकिस्तान युद्ध. मी त्यांना म्हणालो की, जर तुम्हाला युद्ध करायचे असेल आणि तुमच्याकडे अण्वस्त्रे आहे तर मग मी तुमच्या दोघांवरही 100 टक्के 150 टक्के किंवा 200 टक्के असा मोठा टॅरिफ (कर) लावणार आहे. मी त्यांना स्पष्ट म्हणालो की, मी टॅरिफ लावत आहे. 24 तासाच्या आत तुमचे हे युद्ध बंद झालेले असले पाहिजे. मला मनातून वाटते की, टॅरिफ नसता तर हे युद्ध थांबले नसते. शिखर परिषदेमध्ये सहभागी होण्याच्या काही तास अगोदर त्यांनी हे भाष्य केले.

22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. या हल्ल्यात फक्त हिंदू पर्यटकांना टार्गेट करत त्यांच्या कुटुंबियांसमोर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट बघायला मिळाली. या हल्ल्यातील सर्व दहशतवादी हे पाकिस्तानातून आल्याचे स्पष्ट झाले. हेच नाही तर त्यांनी हल्ल्याच्या ठिकाणाची रेकी देखील केली. पहलगाम हल्ल्याचे काही फोटो आणि व्हिडीओही व्हायरल होताना दिसली.

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबण्यात आले. पाकिस्तानात घुसून भारताने दहशतवाद्यांची अड्डे नष्ट केली. यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू झाले आणि दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत होते. यादरम्यान आपण या युद्धात मध्यस्थी केल्याचा दावा वारंवार डोनाल्ड ट्रम्प दिसले. भारताने स्पष्ट केले की, या युद्धात कोणीही हस्तक्षेप न करता व्दिपक्षीय चर्चेनंतर दोन्ही देशांनी युद्ध थांबवले.

वेगळ्या विदर्भासाठी काम सुरू, भाजपच्या बावनकुळे यांचं मोठं विधान
वेगळ्या विदर्भासाठी काम सुरू, भाजपच्या बावनकुळे यांचं मोठं विधान.
सत्ताधाऱ्यांनाच EVM वर भरवसा नाही का? सत्ताधाऱ्यांकडून खासगी पहारा....
सत्ताधाऱ्यांनाच EVM वर भरवसा नाही का? सत्ताधाऱ्यांकडून खासगी पहारा.....
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.