Donald Trump : आधी तावात आले, नंतर तोंडावर आपटले, डोनाल्ड ट्रम्प अखेर अपयशी, स्वत:च म्हणाले…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धावर मोठं भाष्य केलं आहे. ट्रम्प यांनी अखेर ती एक गोष्ट मान्य केली आहे. त्यामुळे आता या युद्धाचे भवितव्य काय असे विचारले जात आहे.

Donald Trump On Russia And Ukraine : गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहेत. विशेष म्हणजे अलिकडेच त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांच्याशी युद्ध थांबवण्यावर चर्चाही केली. मात्र असे असूनही रशिया आणि युक्रेन एकमेकांवर मोठे हल्ले करताना दिसत आहेत. दरम्यान, आता याच युद्धविरामाच्या प्रयत्नांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. मला वाटलं होतं की मी एका दिवासात हे युद्ध थांबवेन. पण हे युद्ध फारच कठीण दिसतंय, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.
युद्ध थांबवणं सोपं असेल असं वाटलं होतं, पण…
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवणे सोपे काम नसल्याचे, डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केले आहे. सोमवारी (15 सप्टेंबर) ट्रम्प यांनी एका माध्यमाशी बोलताना तसे भाष्य केले आहे. मी आतापर्यंत सात युद्ध थांबवले आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवणेही सोपे असेल असे मला वाटले होते. मात्र आता हे काम कठीण असल्याचे सिद्ध आहे, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले.
पुतिन-झेलेन्स्की एकमेकांचा तिरस्कार करतात
व्लादीमीर पुतिन आणि वोलोडिमीर झेलेन्स्की यांच्यात असलेल्या वैराबद्दलही ट्रम्प बोलले आहेत. झेलेन्स्की आणि पुतिन हे एकमेकांचा तिरस्कार करतात. त्यांचा एकमेकांवर फारच राग आहे. त्यामुळेच ते एकमेकांशी बोलत नाहीत. एकमेकांप्रती राग असल्याने त्यांच्यात चर्चा होऊ शकत नाहीये, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे.
आता नेमके काय होणार?
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा पदाभार सांभाळून नऊ महिने लोटले आहेत. या काळात त्यांनी रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र यात त्यांना अजूनही यश आलेले नाही. असे असतानाच ट्रम्प यांनी वर केलेल्या भाष्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
