Trump Tariff War : ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब, 25 टक्के टॅरिफ लावला, आता कुठल्या सेक्टरला फटका?
Trump Tariff War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफ बॉम्ब फोडला आहे. त्यांनी 25 टक्के टॅरिफ लावला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जगातील अनेक देश अस्थिर झाले आहेत. अर्थव्यवस्थांना त्याचा फटका बसत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता एक नवीन टॅरिफ बॉम्ब फोडला आहे. 1 नोव्हेंबरपासून आयात होणारे मध्यम आणि वजनदार ट्रक्स आणि त्यांच्या पार्ट्सवर 25 टक्के टॅरिफ लावण्यात येईल. त्यासोबतच आयात होणाऱ्या बसेसवर 10 टक्के टॅरिफ लावला जाईल. अधिकाऱ्यांनुसार राष्ट्रीय सुरक्षेच्या आधारावर हा टॅरिफ लावला जात आहे. त्याचा उद्देश जास्तीत जास्त ऑटो उत्पादनं अमेरिकेत स्थानांतरित करणं आहे. हा मेक्सिकोसाठी मोठा झटका आहे. मेक्सिकोमधूनच अमेरिकेला मध्यम आणि भारी ट्रक्सची निर्यात होते.
नव्या टॅरिफ श्रेणीत 3 ते 8 श्रेणीचे सर्व ट्रक्स आहेत. यात मोठे पिक-अप ट्रक, मूविंग ट्रक, कार्गो ट्रक, डंप ट्रक आणि 18 चाकी ट्रॅक्टर यांचा समावेश आहे. अमेरिकी ट्रक उत्पादक कंपन्यांना परदेशी उत्पादक कंपन्यांच्या स्पर्धेपासून वाचवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलय असं ट्रम्प म्हणाले. या निर्णयामुळे पॅकरची मालकी असलेल्या पीटरबिल्ट आणि केनवर्थ-डेमलर ट्रकची मालकी असलेल्या फ्रेटलाइनर सारख्या कंपन्यांना फायदा होईल.
अमेरिकी चेंबर ऑफ कॉमर्सने काय म्हटलेलं?
ट्रक्सवर नवीन टॅरिफ लावू नका असं अमेरिकी चेंबर ऑफ कॉमर्सने ट्रम्प यांना आवाहन केलेलं. मेक्सिको, कॅनडा, जपान, जर्मनी आणि फिनलँड या पाच देशातून प्रामुख्याने आयात होते. ते अमेरिकेचे सहयोगी किंवा जवळचे भागीदार आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी ते धोकादायक नाहीत. या आदेशामुळे जीएम, फोर्ड, टोयोटा, स्टेलंटिस, होंडा, टेस्ला आणि अन्य वाहन निर्माता कंपन्यांनी आधीपासून आयात केलेल्या ऑटो पार्ट्सवर वित्तीय दिलासा मिळणार आहे.
भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट हे धोरण अनुसरलं आहे. त्यानुसार त्यांनी विविध देशातून अमेरिकेत आयात होणाऱ्या सामानावर टॅरिफ लावला आहे. भारतीय सामानावर सध्या 50 टक्के टॅरिफ आहे. यामुळे अमेरिकेत भारतीय सामान महागलं असून त्याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार आहे. अमेरिकेत वस्तुंच उत्पादन वाढवणं हा डोनाल्ड ट्रम्प यांचा यामागे उद्देश आहे. पण त्यांना यात यश येताना दिसत नाहीय. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ आकारलेला आहे.
