AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russian Oil Purchase : सतत नडणाऱ्या ट्रम्प यांना भारताने दिला पहिला मोठा दणका, थेट कृतीमधून अमेरिकेला इशारा

Russian Oil Purchase : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अलीकडे सतत भारतविरोधी निर्णय घेत आहेत. आता भारताने सुद्धा थेट आपल्या कृतीमधून अमेरिकेला मोठा संदेश दिला आहे. ट्रम्प यांची आणि त्यांच्या डॉलरची दादागिरी मोडून काढण्यासाठी तिकडीने पावलं उचलली आहेत.

Russian Oil Purchase : सतत नडणाऱ्या ट्रम्प यांना भारताने दिला पहिला मोठा दणका, थेट कृतीमधून अमेरिकेला इशारा
Donald Trump
| Updated on: Oct 18, 2025 | 12:36 PM
Share

ट्रेड, टॅरिफ आणि रशियन तेल खरेदीवरुन भारताला नडत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने पहिला मोठा धक्का दिला आहे. रिपोर्टनुसार, भारताने रशियाकडून कच्चं तेलं विकत घेऊन चिनी मुद्रा युआनमध्ये पेमेंट केलं आहे. म्हणजे भारत रशियाकडून कच्च तेल विकत घेत आहे. पण पेमेंट मात्र, चिनी मुद्रा युआनमध्ये करत आहे. डॉलरच वर्चस्व मोडून काढण्याचा हा मोठा कट मानला जात आहे. भारताच्या टोटल डीलच्या तुलनेत चिनी मुद्रेमध्ये होणारं पेमेंट कमी आहे. पण यामुळे भारताकडून पेमेंट सिस्टिममध्ये होणारा बदल लक्षात येतो. यातून ही सुद्ध गोष्ट लक्षात येते की, भारत-चीन आणि रशियाने ब्रिक्स करन्सी न बनवता ट्रम्प यांच्या डॉलरच्या अभिमानाला धक्क्याला लावायला सुरुवात केली आहे.

आंतरराष्ट्रीय मुद्रा बाजारात एका युआनची किंमत 12.34 भारतीय रुपये आहे. भारताचं हे पाऊल भले छोटं असेल, पण याचे राजकीय परिणाम मोठे आहेत. यातून एक संदेश जातो. भारत अजूनही प्रामुख्याने रशियन मुद्रा रुबलमध्ये पेमेंट करत आहे, असं रशियाचे उप पंतप्रधान अलेक्झांडर नोवाक म्हणाले. भारताने आता युआनमध्ये पेमेंट सुरु केलय. ब्रिक्स मुद्रेशिवाय उचललें हे पाऊल भारत-रशिया आणि चीनची आघाडी मजबूत बनवत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘डॉलर डिप्लोमेसी’साठी हा मोठा झटका आहे.

याचा अर्थ काय?

Investing live वेबसाइटने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलय की, भारत सरकारची कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने अलीकडेच दोन ते तीन रशियन तेल कार्गोचं पेमेंट युआनमध्ये केलं. हे पाऊल म्हणजे 2023 नंतरच्या बदलाचे संकेत आहेत. त्यावेळी चीनसोबत तणावपूर्ण संबंध निर्माण झाल्याने सरकारी रिफायनरीजने युआनमध्ये पेमेंट थांबवलं होतं. खासगी रिफायनरीकडून मात्र युआनमध्ये पेमेंट सुरुच होतं. भारताने चिनी मुद्रेमध्ये पेमेंट सुरु करण्याचा अर्थ असा आहे की, भारत-चीन संबंध आता पूर्वीप्रमाणे सुरळीत झाले आहेत.

ट्रम्प यांनी काय इशारा दिलेला?

भारताकडून कच्चा तेलाच्या पेमेंट सिस्टिमध्ये बदल याचा संबंध राष्ट्रपती ट्रम्प यांच्या एका स्टेटमेंटशी आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ब्रिक्स (ब्राझील रशिया, भारत, चीन, दक्षिण अफ्रीका) यांनी नवीन मुद्रा बनवण्याच्या आणि डॉलरच्या पर्यायाला समर्थन करण्यावरुन इशारा दिला होता. ट्रम्प यांनी 30 नोव्हेंबर 2024 रोजी ट्रूथ सोशलच्या पोस्टमध्ये म्हटलेलं की, “ब्रिक्स देशांनी नवीन मुद्रा बनवू नये. अन्यथा त्यांच्यावर 100 टक्के टॅरिफ लागेल. अमेरिकी बाजारपेठांमधून या देशांना निरोप मिळेल”

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.