डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकेत प्रेग्नंट महिलांच्या प्री डिलीव्हरीसाठी दवाखान्यात रांगा…

या नियमानुसार कोणा व्यक्तीचा जन्म जर अमेरिकेत झाला तर जन्माआधारे त्याला अमेरिकेचे थेट नागरिकत्व मिळत होते. जरी त्याचे आई-वडील दुसऱ्या देशाचे असतील तरी त्या व्यक्तीला ग्रीन कार्ड मिळते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकेत प्रेग्नंट महिलांच्या प्री डिलीव्हरीसाठी दवाखान्यात रांगा...
Follow us
| Updated on: Jan 23, 2025 | 4:21 PM

अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी शपथ घेतली आहे. त्यांनी आपल्या शपथविधीनंतर तात्काळ काही महत्वाचे निर्णय घेतले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत जन्माधारीत नागरिकत्व देण्याबाबतच्या घेतलेल्या निर्णयाने गर्भवती महिलांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आता गर्भवती महिलांनी मॅटर्निटी होममध्ये रांगा लावल्या आहेत. या महिलांना त्यांच्या बाळांची वेळेच्या आधी म्हणजे २० फेब्रुवारीच्या आधी डिलिव्हरी करायची आहे. अमेरिकेत झालेल्या सर्वेक्षणानुसार हा कायदा रद्द करण्यास वयस्क अमेरिकन नागरिकांनी विरोध केला आहे.

आमच्याकडे वेळेआधीच आपली प्रसुती करावी अशी विनंती करणाऱ्या गर्भवती महिलांची संख्या वाढत चालली आहे. या बहुमतांशी भारतीय महिलांचा समावेश आहे. त्यांना त्यांची प्रसुती ८ व्या किंवा ९ व्या महिन्यात करायची आहे. या सर्व महिलांना २० फेब्रुवारीच्या आधी आपल्या बाळाचा जगात प्रवेश करायचा आहे. यात काही महिला अशा आहेत ज्यांच्या नियमित डिलीव्हरीला अजून एक महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे असे न्यु जर्सीच्या एका डॉक्टरने सांगिलते आहे.

काय नुकसान होणार

सात महीन्यांची गर्भवती महिला आपल्या पतीसोबत आली होती आणि प्री टर्म डिलिव्हरी करायची आहे. तिची डिलिव्हरी मार्चसाठी ड्यू आहे. वास्तविक २० फेब्रुवारीनंतर परकीय नागरिकांचे मुल जरी अमेरिकेत जन्माला आले तरी त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार नाही. या आधीच्या निर्णयाप्रमाणे अमेरिकेचे नागरिक नसलेल्या किंवा ग्रीनकार्ड धारक नसलेल्या पालकांना त्यांच्या मुलाचा जन्म जरी अमेरिकेत झाला तर आपोआप नागरिकत्व मिळत होते.

मी दाम्पत्यांना विनंती करते की जरी वेळेआधी प्रसुती शक्य असली तर यात मुलाला धोका असतो. त्यात अनेक अडचणी असून अविकसित फुप्फुसे, कमी वजन, न्युरोलॉजिकल समस्यांसह त्रास होऊ शकतात असे टेक्सासच्या एक डॉक्टर एसजी मुक्कल यांनी स्पष्ट केले. त्यांनी स्पष्ट सांगितले की गेल्याकाही दिवसात त्यांनी १५ ते २० जोडप्यांशी या विषयावर चर्चा केली आहे.

आम्ही  ग्रीन कार्ड्ससाठी सहा वर्षे वाट पाहात आहोत. आमच्या कुटुंबाला स्थिरता मिळविण्याचा हाच एक पर्याय होता. आम्हाला अनिश्चितेने मानसिक त्रास होत आहे असे मार्चमध्ये बाळाचा जन्म देण्याच्या तयारीत असलेल्या एका महिलेने वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. आठ वर्षांपूर्वी बेकायदेशीरपणे अमेरिकेत पोहचलेल्या एका व्यक्तीने सांगितले की मी आणि माझी पत्नी ट्रम्प यांच्या या निर्णयाने खूप दु:खी आहोत.

आम्ही विचार केला होता की आम्ही आता शरणार्थी बनणार आहोत. परंतू माझी पत्नी गर्भवती होती आणि आमच्या वकीलांनी सांगितले की आम्ही आमच्या मुलाच्या जन्मामुळे आम्ही थेट अमेरिकेचे नागरीक बनणार आहोत असे अन्य एका नागरिकाने सांगितले.

ट्रम्प यांच्या निर्णया विरुद्ध खटला दाखल

अमेरिकेच्या २२ प्रांतांचे अटर्नी जनरल यांनी ट्रम्प यांच्या त्या शासकीय आदेशाविरोधात मंगळवारी खटला दाखल केला आहे. देशात जन्मलेल्या मुलाला थेट अमेरिकेचे नागरिकत्व देण्याचा शंभर वर्षे जुना नियम रद्द करण्याचे पाऊल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी उचलले आहे. या नियमानुसार कोणा व्यक्तीचा जन्म जर अमेरिकेत झाला तर जन्माआधारे त्याला अमेरिकेचे थेट नागरिकत्व मिळत होते. जरी त्याचे आई-वडील दुसऱ्या देशाचे असतील तरी त्या व्यक्तीला ग्रीन कार्ड मिळते.

स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी
स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी.
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता...
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता....
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय.
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली.
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?.
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला.
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार.
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही.
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले...
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले....
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी.