शेख हसीना यांना परत करा अन्यथा, बांगलादेशने दिली भारताला पुन्हा धमकी
भारत आणि बांगलादेश या दोन शेजारी देशात तणाव पसरला आहे. एकेकाळी भारताचा मित्र असलेला बांगलादेश सध्या भारताला धमक्या देत आहे.

भारत आणि बांगलादेशातील वातावरण सध्या तणावाचे बनले आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पण संदर्भात शेजारील देश बांगला देशाच्या पोटात पुन्हा मुरडा उठला आहे. भारताने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशच्या हवाली केले नाही तर हा दोन्ही देशातील झालेल्या प्रत्यार्पण कायद्याचा स्पष्ट उल्लंघन असेल त्यामुळे भारताने शेख हसीना यांना आमच्या हवाली करावे असे मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारचे विधी आणि न्याय सल्लागार आसिफ नजरुल यांनी म्हटले आहे.
ढाका ट्रीब्यून या वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार बांगलादेशचे विधी आणि न्याय सल्लागार आसिफ नजरुल यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेतील आहे. यावेळी त्यांनी शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी भारताला पत्र लिहीले आहे. जर भारताने शेख हसीना यांना प्रत्यार्पण केले नाही तर हा दोन्ही देशादरम्यान झालेल्या कराराचा भंग असेल असे म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर विषय नेऊ
एवढेच नाही तर जर भारताने शेख हसीना यांना आमच्या हवाली केले नाही तर बांगलादेशाच्या परराष्ट्र मंत्रालय आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडे जाऊन या मुद्द्याला मांडणार आहे. हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत. सरकार शेख हसीना यांना मायदेशात परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न करणार आहे. जर आवश्यकता वाटली तर आम्ही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हा मुद्दा मांडू असेही आसिफ नजरुल यांनी म्हटले आहे.




बांगलादेशाचे संबंध बिघडले
गेल्यावर्षी ५ ऑगस्ट रोजी बांगलादेशात विद्यार्थ्यांनी उठाव करीत शेख हसीना यांचे सरकार उलथवून लावले होते. त्यावेळी तत्कालिन पंतप्रधान शेख हसीना यांना परांगदा व्हावे लागले होते. यावेळी शेख हसीना यांनी भारतात आश्रय मागितला होता. त्यानंतर तेव्हापासून त्या भारतात आहेत. आणि या वरुन भारत आणि बांगलादेशाचे संबंध बिघडले आहेत. सीमेवर देखील या वादाचा परिणाम पाहायला मिळाला आहे.भारताने बांगलादेशाचे कार्यवाहक उच्चायुक्त नूर – अल- इस्लाम यांनी समन्स पाठविले आहे. भारताने दोन्ही देशांच्या सीमांवर कुंपण बांधण्यासंदर्भात शिष्टाचाराचे पालन केल्याचे देखील भारताने त्यांना म्हटले होते.