Earthquake : नेपाळमध्ये भूकंपाने अनेक घरे ढासळली, दिल्लीपर्यंत बसले धक्के
Earthquake in Nepal : नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाचे हादरे उत्तर भारतात ही जाणवले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील बझांग भागातील चैनपूर येथे होते. सध्या तेथे काही घरे कोसळल्याचे वृत्त आहे. मदत आणि बचाव पथके सक्रिय करण्यात आली असून सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची बातमी नाही.

काठमांडू : नेपाळमध्ये मंगळवारी दुपारी जोरदार भूकंपामुळे बझांग आणि चैनपूर भागातील अनेक घरे कोसळल्याचे वृत्त आहे. याशिवाय बझांग परिसरातील अनेक रस्ते भूस्खलनामुळे बंद झाले आहेत. काही ठिकाणी गुरे मरण पावल्याचेही वृत्त आहे. येथील भूकंप इतका तीव्र होता की त्याचे धक्के दिल्ली एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात जाणवले. नेपाळच्या भूकंप विभागाने त्याची तीव्रता 6.3 इतकी मोजली आहे. बझांग भागातील चैनपूर येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
नेपाळला मंगळवारी सकाळी पहिला भूकंपाचा धक्का बसला, दुपारी ३.०६ वाजता आलेला सर्वात मोठा धक्का चौथा होता. दुपारी 2:40 वाजता तिसरा धक्का बसला जो इतका जोरदार होता की त्याची कंपने दिल्ली NCR पर्यंत जाणवत होती, त्यानंतर चौथा धक्का इतका तीव्र होता की त्यामुळे नेपाळच्या अनेक भागात घरांना तडे गेले. काही भागांतून घरे कोसळल्याचेही वृत्त आहे. सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. सध्या भूकंपामुळे झालेल्या भूस्खलनामुळे दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
नेपाळमध्ये चार वेळा भूकंप
नेपाळच्या भूकंप विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये दोन नव्हे तर चार भूकंपाचे धक्के जाणवले, मात्र यापैकी फक्त दोनच धक्के दिल्ली एनसीआरपर्यंत जाणवले. नेपाळमध्ये पहाटे ३.४५ वाजता भूकंपाचा पहिला धक्का जाणवला, त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.० इतकी होती. यानंतर सकाळी 11 वाजता दुसरा धक्का बसला ज्याची तीव्रता अंदाजे 2.7 इतकी होती. नेपाळमध्ये तिसरा भूकंप दुपारी 2:40 वाजता झाला. या भूकंपाची तीव्रता 5.3 होती, हा पहिला धक्का होता ज्याचे धक्के दिल्ली एनसीआरपर्यंत जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू बझांगचा तालकोट होता. यानंतर, 6.3 तीव्रतेचा तिसरा धक्का बसला ज्यामुळे नेपाळमध्ये भूस्खलन आणि घरे कोसळण्याच्या आणि तडे जाण्याच्या घटना घडल्या.
#WATCH | Few buildings in Bajhang district suffer damage after 6.2 magnitude earthquake strikes Nepal
(Source: API-Nepal) pic.twitter.com/t7Bn90MNEe
— ANI (@ANI) October 3, 2023
मुख्य जिल्हा अधिकारी नारायण पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे भूस्खलनाचे वृत्त आहे, त्यामुळे बझांग ते कैलानीला जोडणारा रस्ता बंद झाला आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, खोर्पे ते चैनपूर भागाकडे जाणाऱ्या रस्त्यालाही भूकंपाचा तडाखा बसला आहे. दरड कोसळल्याने हा रस्ताही बंद झाला असून, तो खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
