डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांचा H-1B व्हिसाच्या वादात ‘तो’ फोटो व्हायरल, मस्क यांनी थेट…
Donald Trump and Elon Musk Photo : डोनाल्ड ट्रम्प हे एका मागून एक धक्कादायक अशी निर्णय घेताना दिसत आहेत. रशियाकडून तेल खरेदी भारतासह चीनने बंद करावी, याकरिता त्यांच्याकडून सतत प्रयत्न केली जात आहेत. H-1B व्हिसाच्या नियमात त्यांनी काही बदल केली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कधी काय निर्णय घेतील, याचा अजिबातच नेम नाही. डोनाल्ड ट्रम्प हे भारताला एका मागून एक मोठे धक्के देताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसावरून मोठी चाल भारताविरोधात खेळली. काहीही करून रशियाकडून भारताने तेल खरेदी बंद करावी, यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मात्र, अमेरिकेचा टॅरिफ असू किंवा अजून काही भारता हा अमेरिकेच्या अटी अजिबातच मान्य करत नाहीये. त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसावर तब्बल 88 लाख रूपये शुल्क आकारले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला अमेरिकेतूनही जोरदार विरोध होताना दिसत आहे. अनेक टेक कंपन्या या कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. यावरून भारताच्या विरोधात जरी डोनाल्ड ट्रम्प निर्णय घेत असले तरीही त्यांच्यावरच ते भारी पडताना स्पष्ट दिसत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाबद्दल घेतलेला निर्णय टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनाही अजिबातच पटला नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांनी स्पष्ट म्हटले की, अमेरिका ज्या ठिकाणी सध्या पोहोचली आहे, त्यामध्ये H-1B व्हिसा धारकांचे मोठे योगदान आहे, त्यांच्याशिवाय हे शक्यच नव्हते. जर H-1B व्हिसामध्ये काही केले तर मी असे युद्ध सुरू करेल, याचा विचारही तुम्ही करू शकणार नाहीत. H-1B व्हिसाच्या मुद्द्यावरून ट्रम्प आणि एलन मस्क एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे.
एलन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प हे चांगले मित्र होते. मात्र, त्यांच्या वाद झाल्याची चर्चा आहे. आता बऱ्याच दिवसानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क हे एकत्र दिसले आहेत. हेच नाही तर यांच्या भेटीचा एक फोटोही पुढे आलाय. एलन मस्क यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत भेटीचे कारणही थेट सांगून टाकले आहे. या फोटोमध्ये मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प एकमेकांना बोलताना दिसत आहेत.
For Charlie pic.twitter.com/8092jIt319
— Elon Musk (@elonmusk) September 21, 2025
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचा फोटो शेअर करत मस्कने लिहिले की, चार्लीसाठी…ट्रम्प यांच्या जवळचे कार्यकर्ते चार्ली कर्क यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. रविवारी त्यांच्या श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. H-1B व्हिसाच्या बदललेल्या नियमानंतर मस्क यांच्याकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत.
